इंदिरा गांधींची तुलना हिटलरशी, अरुण जेटलींची थेट टीका

इंदिरा गांधींनी हुकtमशाहीच्या माध्यमातून घराणेशाही राबवण्याचाही प्रयत्न केल्याची टीका त्यांनी ट्विटरवरून केलीय.

Updated: Jun 25, 2018, 11:11 PM IST

नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी इंदिरा गांधी यांची तुलना थेट हिटलरशीच केलीय. जेटली यांनी ट्विटवर ही तुलना केलीय. हिटलर आणि इंदिरा गांधींनी राज्यघटना रद्द न करता त्यांनी राज्य घटनेचाच वापर करून लोकशाहीचं हुकूमशाहीत रुपांतर केल्याची टीकाही जेलटींनी इंदिरा गांधींवर केलीय. तसंच इंदिरा गांधींनी हुकtमशाहीच्या माध्यमातून घराणेशाही राबवण्याचाही प्रयत्न केल्याची टीका त्यांनी ट्विटरवरून केलीय. 

निवडणूक कायदेशीर ठरवण्यासाठी इंदिरा गांधींनी कायद्यात बदल केला. इंदिरा गांधींनी लोकशाही घराणेशाहीत बदलण्याचा प्रयत्न केला. हिटलर आणि इंदिरा गांधींनी राज्यघटना रद्द ठरवली नाही. मात्र, तिच्या माध्यमातून हुकूमशाही राबवण्याचा प्रयत्न केला. हिटलरसारखंच इंदिरा गांधींनी विरोधकांना जेलमध्ये पाठवलं, असं जेटली यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. 

तर हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी केलीय.