दिवाळी बोनस म्हणून कर्मचाऱ्यांना कार, मोदींच्या हस्ते देणार भेट

यंदाही या कंपनीने कर्मचाऱ्यांना केलं खूश

Updated: Oct 25, 2018, 12:00 PM IST
दिवाळी बोनस म्हणून कर्मचाऱ्यांना कार, मोदींच्या हस्ते देणार भेट title=

मुंबई : दिवाळीच्या मुहूर्तावर सूरतमधील डायमंड कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना बोनसमध्ये कार आणि फ्लॅट देणार आहेत. सूरतमधील हरि कृष्णा एक्सपोर्ट आपल्या 600 कर्मचाऱ्यांना हे गिफ्ट देणार आहे. ज्यामध्ये दोन महिला कर्मचाऱ्यांना स्वत: पंतप्रधान मोदी गाडीची किल्ली देणार आहेत. गुरुवारी पीएम मोदी दिल्लीमध्ये 'स्किल इंडिया इंनसेंटिव सेरेमनी' कार्यक्रमात कंपनीच्या या दोन महिला कर्मचाऱ्यांना चांगलं काम केल्यामुळे त्यांना गाडीची किल्ली सुपूर्त करणार आहेत.

1600 कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस

कंपनीचे चेअरमन सवजी ढोलकिया यांनी म्हटलं की, 'यावर्षी कंपनीने 1,600 डायमंड पॉलिश करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवडलं आहे. ज्यांचं काम मागच्या वर्षाच चांगलं होतं. आम्ही त्यांना इन्सेंटिव देणार आहोत. ज्यांना कार पाहिजे त्यांनी कार घ्यावी. ज्यांना फ्लॅट पाहिजे त्यांनी फ्लॅट किंवा मग फिक्स्ड डिपॉजिट हवं तर तसं ही त्यांना दिलं जाणार आहे. भविष्यात देखील आणखी चांगलं काम करण्यासाठी त्यांना ही गोष्ट प्रेरणा देईल.' 

आतापर्यंत 300 फ्लॅटचं वाटप

डायमंड पॉलिश करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारुती सुजुकी ऑल्टो किंवा सेलेरियो कार मिळणार आहे. कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना मागील 4 वर्षापासून अशाच प्रकारे दिवाळीनिमित्त महागडी भेट देत आहे. ढोलकिया यांनी म्हटलं की, '5,500 कर्मचाऱ्यांपैकी 4,000 कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून असे गिफ्ट मिळाले आहेत. कंपनीने आतापर्यंत 300 जणांना फ्लॅट गिफ्ट केले आहेत. आणखी फ्लॅटचं निर्माण केलं जात आहे.'