नवी दिल्ली : वर्ध्याचे सुपुत्र लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांना परम विशिष्ट सेवा पदक जाहीर झालंय. तर धुळ्याचे सुपुत्र मिलिंद खैरनार यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर झालंय. निंभोरकर यांच्या नेतृत्त्वात सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला होता.
पाकिस्तानच्या सीमेत घुसून त्यांनी दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त केले होते. या विशेष योगदानाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आलाय. तर बांदीपुरामध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले एअर फोर्स गरूडचे कमांडो मिलिंद खैरनार यांना शौर्य चक्र देऊन गौरव करण्यात आलाय.
शहीद मिलिंद खैरनार यांनी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यावेळी नरिमन हाऊस येथे उल्लेखनीय कामगिरी केली होती. नरिमन हाऊसमध्ये दडून बसलेल्या दहशतवाद्यांना ठार करण्यात मोलाची कामगिरी मिलिंद खैरनार यांनी बजावली होती.