मुंबई : पाच दिवसांच्या दिवाळीला आजपासून म्हणजे धनत्रयोदशीपासून (Dhanteras 2020) सुरूवात झाली आहे. हिंदू धर्मात दिवाळी या सणाला सर्वाधिक महत्व आहे. या दिवशी सोने, चांदी, धन, भांडी यांची पूजा करतात. हिंदू कॅलेंडरप्रमाणे, कार्तिक मास, कृष्ण पक्षात त्रयोदशी तिथीला दरवर्षी धनत्रयोदशी साजरी केली जाते. या वर्षी म्हणजे २०२० मध्ये १३ नोव्हेंबर रोजी शुक्रवारी धनत्रयोदशी (Dhantrayodashi) साजरी होत आहे.
दिवाळी या दिवसानंतर तीन दिवस दिवाळी उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी 'धन्वंतरी' देवाची पूजा केली जाते. तसेच या दिवसाला शुभ दिवस मानून सोनं, चांदी, भांडी, दागिने खरेदी केले जातात.
यावर्षी कार्तित मासातील कृष्ण पक्षात त्रयोदशी तिथीचा प्रारंभ १२ नोव्हेंबर गुरूवारी रात्री ९ वाजून ३० मिनिटांनी झाला आहे. १३ नोव्हेंबर रोजी शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजून ०१ मिनिटांच मुहुर्त आहे. धनत्रयोदशीच्या पूजेकरता २७ मिनिटांचा शुभ मूहूर्त आहे.
धनत्रयोदशी मुहूर्त : १७:३४:०० ते १८:०१:२८ पर्यंत
अवधि : ० तास २७ मिनिटे
प्रदोष काल : १७:२८:०१ ते २०:०७:११ पर्यंत
वृषभ काल : १७:३४:०० ते १९:२९:५१ पर्यंत
धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा विशेष पद्धतीने केली जाते. तसेच या दिवशी उत्तर दिशेला कुबेर आणि धन्वंतरीची स्थापना करून तुपाचा दिवा लावला जातो. कुबेराला पांढऱ्या रंगाची आणि धन्वंतरीसमोर पिवळ्या रंगाची मिठाईचा नैवैद्य ठेवला जातो. "ॐ ह्रीं कुबेराय नमः" आणि "धनवंतरी स्तोत्र" जप केला जातो. घरातील सोन्या, चांदीचे दागिने आणि नाण्यांची पूजा केली जाते. घराच्या बाहेर राईच्या तेलाचा दिवा देखील लावला जातो.
यंदा धनत्रयोदशी आणि वसूबारस देखील आहे. भारतीय संस्कृतीत पशूधनाची देखील पूजा केली जाते. वसुबारसच्या दिवशी गोधनाची आणि प्राण्यांची पूजा करण्याची परंपरा आहे. गायीच्या पूजनाने सर्व देवतांपाशी आपली सेवा पोहचत असल्याचे मानले जाते. या दिवशी गायीला नैवेद्य दाखवले जाते.
धनत्रयोदशीपासून यंदा दिवाळी सुरू झाली आहे. पाच दिवस असणारी दिवाळी यंदा फक्त तीनच दिवस आहे. धनत्रयोदशीच्या निमित्ताने आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.