राम रहीमच्या डेऱ्याची ९० बँक खाती गोठवली

राम रहीम याला शिक्षा झाल्यानंतर दररोज नवनवीन प्रकरणांचे खुलासे होत आहेत.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 20, 2017, 05:17 PM IST
राम रहीमच्या डेऱ्याची ९० बँक खाती गोठवली  title=
File Photo

नवी दिल्ली : राम रहीम याला शिक्षा झाल्यानंतर दररोज नवनवीन प्रकरणांचे खुलासे होत आहेत.

सीबीआयच्या विशेष न्यायालयाने २५ ऑगस्ट रोजी बलात्कार प्रकरणात राम रहीमला दोषी ठरवलं आणि त्यानंतर शिक्षा सुनावण्यात आली. रविवारी हरियाणा पोलिसांच्या एसआयटी टीमने पंचकूला आणि सिरसा येथील डेरा अध्यक्षांची चौकशी केली. त्यानंतर अनेक खुलासे झाले आहेत.

पोलिसांच्या चौकशीत डेरा सच्चा सौदाकडे असलेल्या संपत्तीची माहिती आधीच समोर आली होती. फक्त सिरसामध्ये डेरा सच्चा सौदाचे ३ बँकांमध्ये तब्बल ९० हून अधिक बँक खाते आहेत. या बँक खात्यांमध्ये जवळपास ६८.५० कोटी रुपये जमा आहेत. आता पोलिसांनी हे सर्व बँक खाते गोठविले आहेत.

पोलिसांनी गोठविलेली ही सर्व बँक खाती करंट अकाऊंट होते आणि सर्व डेरा सच्चा सौदा ट्रस्ट तसेच डेराच्या इतर नावांवर होती.