बाबा राम रहीमबद्दलचे १० महत्वाचे खुलासे

साध्वींच्या रेप केसमध्ये दोषी सापडलेल्या राम रहीम सिंहविरोधात पुरावे जमा करण्यात येत आहेत. सीबीआयने १९९७ ते २००२ पर्यंत डेरा सोडलेल्या २४ साध्वींपैकी १८ साध्वींचा तपास करून त्यांची चौकशी केली आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Aug 28, 2017, 04:18 PM IST
बाबा राम रहीमबद्दलचे १० महत्वाचे खुलासे  title=

चंदीगड : साध्वींच्या रेप केसमध्ये दोषी सापडलेल्या राम रहीम सिंहविरोधात पुरावे जमा करण्यात येत आहेत. सीबीआयने १९९७ ते २००२ पर्यंत डेरा सोडलेल्या २४ साध्वींपैकी १८ साध्वींचा तपास करून त्यांची चौकशी केली आहे. 

आणि यापैकी फक्त २ साध्वी न्यायालयापर्यंत पोहोचल्या आहेत. आणि या साध्वींच लग्न झालं असून त्यांना मुलं देखील आहेत. जेव्हा सीबीआयने एक आरोपी अवतार सिंह, डेराचे मॅनेजर इंद्रसेन आणि मॅनेजर कृष्ण लाल यांची दिल्लीमध्ये डिटेक्टक टेस्ट केली. तेव्हा ही धक्कादायक माहिती समोर आली की. डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम सेक्शुअल हरॅसमेंट करत असे. जाणून घेऊया साध्वी रेप केस आणि सीबीआय कोर्टनंतर घडलेल्या १० महत्वाच्या घडामोडी आणि खुलासे.... 

१) तीन लिस्टमधून साध्वींचे नाव आले समोर 
२००२ मध्ये एसा साध्वीने लिहिलेल्या चिठ्ठीला उत्तर देताना पंजाब आणि हरियाणा हायकोर्टने सीबीआय चौकशीची मागणी केली. तेव्हा सीबीआयने डेरा मॅनेजर इंद्रसेनकडून १९९९ ते २००१ पर्यंतची साध्वींची यादी मागितली. तेव्हा २००५ मध्ये त्यांना ३ लिस्ट मिळाली. यामध्ये अनुक्रमे ५३, ८० आणि २४ साध्वींची नावे समोर आली. 

२) पहिलं वक्तव्य : रोज रात्री बाबा हॉस्टेलमधून मुलीला बोलवत असतं 
२० वर्ष सेवक असलेल्या रणजीत सिंहची २००२ साली एका निनावी साध्वीच्या पत्रानंतर हत्या करण्यात आली होती. रणजीतचा मेहुणा परमजीत सिंहने सीबीआयच्या स्पेशल मजिस्ट्रेटने जबाब नोंदवला होता. परमजीतने सांगितलं की, त्याची बहिण जुलै १९९९ साली साध्वी झाली. आणि रोज रात्री बाबा गर्ल्स हॉस्टेलमधून साध्वीला गुफेत बोलवत असे. आणि यानंतर एका साध्वीने लगेच डेरा सोडला. ही साध्वी देखील डोरा सोडण्याच्या तयारीत होती मात्र तिच्या भावाच्या बहिणी डेऱ्यात बीएचं शिक्षण घेतं होत्या. मात्र तिने एप्रिल २००१ साली आपला भाऊ, भावाच्या मुली आणि स्वतः डेरा सोडला. 

३) दुसर वक्तव्य - गुफ्यातून रडत बाहेर येत असत साध्वी 
२७ जुलै २००६ मध्ये सीबीआयने कुरूक्षेच्या साध्वीचा जबाब रेकॉर्ड केला. तेव्हा तिने सांगितलं की डेरामुखीने तिच्यावर बलात्कार केला. मात्र आपली प्रतिष्ठा आणि नवऱ्याकडून तलाक मिळण्याच्या भितीने ती शांत राहिली. मात्र जेव्हा डेरा मॅनेजर कृष्ण लाल यांना अटक करण्यात आलं तेव्हा तिने आपल्या नवऱ्याला विश्वासात घेऊन सर्व गोष्टी समोर आणल्या. तिने सांगितले की २८, २९ ऑगस्ट १९९९ रोजी रात्री ८ वाजता मॅनेजरने मला सांगितलं की, बाबाने तुला गुफेत बोलवलं आहे. आणि तेव्हा अन्य साध्वीवर देखील रेप करण्यात आला होता. त्यामुळे ती अलर्ट झाली आणि जाण्यास मनाई केली. मात्र मॅनेजरने तिला उपाशी ठेवण्याची धमकी दिली. त्यामुळे तिला गुहेत जावं लागलं आणि बाबाने तिच्यावर रेप केला. 

४) तिसरं वक्तव्य - माझ्या आणि माझ्या बहिणीवर रेप झाला 
४ मे २००६ मध्ये फतेहाबादची पूर्व साध्वीने सीबीआयला सांगितलं की, १९९८ साली ती साध्वी म्हणून जॉईन झाली. ६ महिन्यानंतर तिची बहिण देखील डेऱ्यात आली. बाबा गर्ल्स हॉस्टेलजवळ राहत असतं आणि साध्वींना संतरी म्हणून ठेवत असत. ज्यांनी सेवा रात्री ८ ते रात्री १२ आणि रात्री १२ ते पहाटे ४ पर्यंत असायची. ज्या दिवशी तिची ही सेवा होती. तेव्हा तिच्यावर रेप झाला आणि ती रडत बाहेर गेली. तिने कुणालाच काही सांगितले नाही मात्र तिच्या बहिणीने सांगितले की माझ्यावर देखील रेप झाला आहे. 

५) बाबाची सिक्रेट गुफा होती, जी बायोमेट्रीक कोडने उघडत असे 
बाबा राम रहीम हा अतिशय ऐशो आरामाचं जीवन जगत होता. महागड्या गोष्टी वापरत असे. बाबा जिथे राहायचा त्या जागेला गुफा म्हटलं जातं असे मात्र ते एका राजमहालापेक्षा काही कमी नव्हते. यामध्ये २०० हून अधिक सुंदर साध्वींना ठेवलं जातं असे. इथे एक बेडरूम देखील असे जो बायोमेट्रीक कोडने खोलला जात असे. 

६) फायर ब्रिगेडच्या पाण्यात तेल घालून दंगल करण्याचा होता विचार 
बाबाला कोर्टाकडून दोषी ठरवल्यानंतर त्याच्या गुंडांनी पोलिसांनी हटवण्यासाठी पूर्ण तयारी केली होती. यासंदर्भात आता रोज एक नवी माहिती समोर येत आहे. शनिवारी जे ७ गनमॅन पकडले गेले ते बाबाला पळून जाण्यासाठी मदत करणार होते. 

७) राम रहीमची सर्वात कमजोर गोष्ट कोणती? 
राम रहिमवर नोंदवण्यात आलेले गुन्हे हीच त्यासाठी कमकुवत गोष्ट होती. बाबा आणि राजकारणी हे एकत्र असल्याचा फायदा होतो हे दोघांना चांगलंच कळलं होतं. म्हणूनच राजकारणी आणि अनेक सेलिब्रिटी आपल्याला राम रहीमकडे दिसत असतं. 

८) जेलमध्ये जाताना मुलींना आपल्यासोबत का ठेवत असे?
रेपिस्ट म्हणून गुन्हा सिद्ध झाल्यानंतरही बाबा राम रहीम बदलला नव्हता. रोहतक जेलमध्ये जाताना बाबाची दत्तक कन्या हनीप्रीत त्याच्यासोबत होती. त्याचं कारण असं देण्यात आलं की बाबा एप्लीकेशनचा शिकार आहे. त्यावेळी त्याची मुलगी सोबत असणं आवश्यक आहे. 

९) ज्यांनी आपल्या शेत जमिनी देण्यास विरोध केला त्यांच्या जमिनींवर शौचालय बांधत असे बाबा 
राम रहीम आपल्या डेऱ्यासाठी चारही बाजूंच्या जागा मागत होता. त्याने १९९० लोकांना धमकावून त्याने ७०० एकर जमीन बळकावली. त्यामुळे अवघ्या काहीशा रुपयांत एवढी मोठी प्रॉपर्टी आहे. 

१०) MSG प्रोडक्टचे ६०० करोड रुपयाचे टर्नओव्हर 
आता या MSG प्रोडक्टसवर अनेक संकट आली आहे. सरकारने यावर निर्बंध लावले आहे. या ब्रँड खाली १५० प्रोडक्ट्स विकण्यासाठी सिरसामध्ये ५ एमएसजी प्रोडक्ट्स शोरूम देखील आहेत.