उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रयागराजमधून निष्काळजीपणाची मोठी घटना समोर आली आहे. एका रुग्णालयात डेंग्यूच्या (dengue) रुग्णाला प्लेटलेट्सऐवजी मोसंबीचा रस (Sweet lemon) दिल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर गुरुवारी हे रुग्णालयाला (Hospital) टाळं ठोकण्यात आलं आहे. रुग्णालयात प्लेटलेट्सऐवजी (platelets) मोसंबीचा ज्यूस डेंग्यूच्या रुग्णाला दिल्याने खळबळ उडाली आहे. प्रदीप पांडे या रुग्णाला प्लेटलेट्सऐवजी मोसंबीचा रस (Sweet lemon) दिल्याने त्याची प्रकृती बिघडल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने कारवाई केली आणि रुग्णालय सील करण्यात आलं आहे. (dengue patient platelets decreased then hospital given Mausambi juice)
अधिकाऱ्यांनी सांगितले की, रुग्ण प्रदीप पांडेची प्रकृती खालावल्यानंतर त्याला शहरातील दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्याचा मृत्यू झाला. मात्र, या घटनेसंदर्भात स्थानिक पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. खासगी रुग्णालयाच्या मालकाने दावा केला की प्लेटलेट्स दुसर्या वैद्यकीय केंद्रातून आणले होते आणि प्लेटलेट्सचे तीन युनिट चढवल्यानंतर रुग्णाला त्रास होऊ लागला.
एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या (सीएमओ) निर्देशानुसार रुग्णालय सील करण्यात आले असून रुग्णाच्या नमुन्याची चाचणी होईपर्यंत रुग्णालय बंद ठेवण्यात आलं आहे. नमुन्याची चाचणी कोण करणार असे विचारले असता, पोलीस औषध निरीक्षकाकडून त्याची चाचणी घेतील असे त्यांनी सांगितले. मात्र, या घटनेसंदर्भात धूमगंज पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
प्रयागराज में मानवता शर्मसार हो गयी।
एक परिवार ने आरोप लगाया है कि झलवा स्थित ग्लोबल हॉस्पिटल ने डेंगू के मरीज प्रदीप पांडेय को प्लेटलेट्स की जगह मोसम्मी का जूस चढ़ा दिया।
मरीज की मौत हो गयी है।
इस प्रकरण की जाँच कर त्वरित कार्यवाही करें। @prayagraj_pol @igrangealld pic.twitter.com/nOcnF3JcgP
— Vedank Singh (@VedankSingh) October 19, 2022
दरम्यान, धूमनगंज रुग्णालयाचे मालक सौरभ मिश्रा यांनी सांगितले की, "प्रदीप पांडे यांना डेंग्यू झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णाच्या प्लेटलेट्सची पातळी 17,000 पर्यंत खाली आल्यानंतर त्याच्या नातेवाईकांना प्लेटलेट्स आणण्यास सांगण्यात आले. रूग्णाच्या नातेवाईकांनी राणी नेहरू (SRN) रूग्णालयातून पाच युनिट प्लेटलेट्स आणल्या होत्या, परंतु तीन युनिट प्लेटलेट्स चढवल्यानंतर रूग्णाला त्रास झाल्याने डॉक्टरांनी प्लेटलेट्स बंद केल्या. रुग्णालयात प्लेटलेट्सची चाचणी करण्याची सुविधा नाही."
मिश्रा म्हणाले की, जे प्लेटलेट्स रुग्णाला दान करण्यात आले, त्यांनी ते कुठून आणले याची तपासणी करावी. प्लेटलेट्सवर एसआरएन पेपर आणि स्टिकर लावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्लेटलेट्सच्या चाचणीबाबत विचारले असता, जिल्हा दंडाधिकारी संजय कुमार खत्री म्हणाले, “प्लेटलेट्सचीही चाचणी केली जाईल. आम्ही या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करू."