Delhi Crime : दिल्लीत (Delhi News) पुन्हा एकदा हादरवणारी घटना समोर आली आहे. दिल्ली सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाच्या उपसंचालकांने (Delhi government official) अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. अधिकाऱ्याने मित्राच्याच मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे अधिकाऱ्याच्या पत्नीनेच मुलीचा गर्भपात केल्याचे मुलीने म्हटलं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांनी या अधिकाऱ्याला निलंबित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर दिल्ली पोलीस (Delhi Police) अधिकाऱ्याच्या घरी त्याला अटक करण्यासाठी पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.
दिल्ली पोलिसांनी रविवारी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली सरकारच्या महिला आणि बाल विकास विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने त्याच्या मित्राच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केला आणि तिचा पत्नीच्या मदतीने गर्भपात केला होता. सोमवारी सकाळी दिल्ली पोलीस आरोपीला त्याच्या घरातून अटक करण्यासाठी पोहोचले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या वडिलांच्या मृत्यूनंतर, अधिकाऱ्याने त्याच्या मुलीला आपल्या घरी आणले होते. त्यानंतर अधिकाऱ्याने तिच्यावर अत्याचार केला.
कसा झाला खुलासा?
जानेवारी 2021 मध्ये पीडित मुलगी तिच्या आईकडे परतली होती. यानंतर त्याला त्रास होऊ लागला. त्यानंतर मुलीच्या आईने तिला रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील समुपदेशन सत्रादरम्यान, अल्पवयीन मुलीने संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्यानंतर रुग्णालयाने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी मुलीच्या तक्रारीनंतर आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी, पीडितेच्या तक्रारीवरून, पोलिसांनी भादवि कलम 376(2), 506, 509, 323, 313, 120ब, 34 आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण तीन वर्षे जुने आहे पण गेल्या आठवड्यात मुलीला रुग्णालयात दाखल केल्यावर हा सगळा प्रकार समोर आला. समुपदेशनानंतर मुलीने डॉक्टरांना सांगितले की, तिला अनेक दिवसांपासून छळ होत आहे. मुलीने आपल्या जबाबात सांगितले आहे की, ती तिच्या पालकांसोबत स्थानिक चर्चमध्ये जात असे. दोघेही सरकारी अधिकारी होते. अधिकारीसुद्धा त्याच्या कुटुंबियांसह तिथे येत असे. यादरम्यान दोन्ही कुटुंबांची ओळख वाढली. 2020 मध्ये मुलीच्या वडिलांचे निधन झाले. यानंतर आईच्या संमतीने मुलगी अधिकाऱ्याच्या कुटुंबाच्या घरी राहायला गेली.
#WATCH | The accused deputy director and his wife are being interrogated. Any other witnesses or accused will be made a part of the investigation: DCP North District Sagar Singh Kalsi on Delhi govt official accused of raping a minor girl pic.twitter.com/rnGRwC58SF
— ANI (@ANI) August 21, 2023
"ऑक्टोबर 2020 ते फेब्रुवारी 2021 पर्यंत मुलगी तिच्या वडिलांच्या मित्रांच्या घरी राहत होती. यादरम्यान अधिकाऱ्याने आपल्यावर लैंगिक अत्याचार केला असा आरोप मुलीने केला आहे. आपल्यावर वारंवार बलात्कार करण्यात आल्याचे मुलीने म्हटले आहे. अधिकाऱ्याच्या पत्नीने जबरदस्तीने मला गोळी देऊन माझा गर्भपात केला असाही आरोप मुलीने केला आहे. गर्भपाताची गोळी त्याच्या पत्नीने दिली होती की नाही याचा आम्ही तपास करत आहोत. मुलीची वैद्यकीय चाचणी झाली आहे," अशी माहिती दिल्लीचे पोलीस उपायुक्त सागर सिंग कलसी यांनी दिली.