ट्रॅफिक पोलीसांची युवकाला जबरदस्त मारहाण ; व्हिडिओ व्हायरल

दिल्लीच्या पटेल नगर मेट्रो स्टेशनजवळ ट्रॅफिक पोलीसांनी एका युवकाला जबरदस्त मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Updated: Mar 1, 2018, 04:38 PM IST
ट्रॅफिक पोलीसांची युवकाला जबरदस्त मारहाण ; व्हिडिओ व्हायरल title=

नवी दिल्ली : दिल्लीच्या पटेल नगर मेट्रो स्टेशनजवळ ट्रॅफिक पोलीसांनी एका युवकाला जबरदस्त मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच पोलीसांनी स्पष्टीकरण देण्यास सुरूवात केली. 

काय झाले नेमके?

स्पेशल कमिश्नर ट्रॅफीक पोलीस दीपेंद्र पाठक यांनी सांगितले की, हा व्हायरल व्हिडिओ पटेल नगरचा असून त्यात एक युवक रस्त्यावर झोपलेला दिसत आहे. तो मुलगा एका मुलीसोबत होता. त्याच्याकडे बाईकचे पेपर्स नव्हते. त्यामुळे  त्याला थांबवण्याचा प्रयत्न करताच त्याने पोलीसांच्या कानाखाली मारली आणि तिथून पळण्याचा प्रयत्न करू लागला. त्याला पकडण्यासाठी पोलीस जेव्हा त्याच्या मागे धावले तेव्हा तो रस्त्यावर झोपला. त्याला उचलून बाजूला करण्यात आले. त्यानंतर ट्रॅफिक पोलीसांनी १०० नंबरवर पीसीआर कॉल केला. 

व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत पोलीस त्या युवकाला जबरदस्त मारताना दिसत आहेत. इतकंच नाही तर त्याला जमिनीवरुन ओढत आणले जात आहे. यावेळी आजूबाजूच्या लोकांनी हा प्रसंग कॅमेऱ्यात कैद केला. पियुष हंस नावाच्या व्यक्तीने हा व्हिडिओ आपल्या ट्विटर हॅंडलवर शेअर केला आहे.