देशातील सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद राजधानी दिल्लीत

राष्ट्रीय अपराध रेकॉर्ड ब्युरोनं 2016 सालचा गुन्हेविषयक अहवाल नुकताच जाहीर केलाय. या रिपोर्टनुसार दिल्ली हे सर्वाधिक गुन्ह्यांचं शहर ठरलंय. एनसीआरबीच्या रिपोर्टनुसार, २०१६मध्ये भारतीय दंड विधान(आयपीसी) अंतर्गत देशातील एकूण गुन्ह्याच्या घटनांपैकी ३८.८ टक्के गुन्हे दिल्लीत घडले. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Nov 30, 2017, 09:44 PM IST
देशातील सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद राजधानी दिल्लीत title=

नवी दिल्ली : राष्ट्रीय अपराध रेकॉर्ड ब्युरोनं 2016 सालचा गुन्हेविषयक अहवाल नुकताच जाहीर केलाय. या रिपोर्टनुसार दिल्ली हे सर्वाधिक गुन्ह्यांचं शहर ठरलंय. एनसीआरबीच्या रिपोर्टनुसार, २०१६मध्ये भारतीय दंड विधान(आयपीसी) अंतर्गत देशातील एकूण गुन्ह्याच्या घटनांपैकी ३८.८ टक्के गुन्हे दिल्लीत घडले. 

मुंबई तिसऱ्या स्थानावर

या यादीत बंगळूरु दुसऱ्या स्थानावर आहे तर आर्थिक राजधानी मुंबई तिसऱ्या स्थानावर आहे. बंगळूरुतील गुन्ह्यांचे प्रमाण ८.९ टक्के इतके तर मुंबईत हे प्रमाण ७.७ इतके आहे. रिपोर्टच्या मते 

बलात्कार, हत्या, अपहरण सारखे तब्बल ४८, ३१, ५१५ गुन्हे देशभरात नोंदवण्यात आले.

गुन्हेगारीत यूपी नंबर वन

राज्यांतील उत्तर प्रदेशमध्ये आयपीसीअंतर्गत गुन्ह्यांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजेच ९.५ टक्के इतके आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर अनुक्रमे मध्य प्रदेश( ८.९ टक्के) आणि महाराष्ट्र(८.८ टक्के) आहेत. केरळमध्ये ८.७ टक्के आहे. 

एनसीआरबीच्या रिपोर्टमधील आकड्यांनुसार, हत्या आणि महिलांविरोधाती गुन्ह्यांची सर्वाधिक नोंद उत्तर प्रदेशमध्ये नोंद झालीये. उत्तर प्रदेशनंतर हत्याच्या सर्वाधिक घटनांची नोंद बिहारमध्ये झालीये. २०१५च्या तुलनेत देशातील बलात्कारांच्या घटनेमध्ये १२.४ टक्क्यांनी वाढ झाली. 

बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद सर्वाधिक मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये झालीये. मध्य प्रदेशात १२.४टक्के, १२.५ टक्के मध्य प्रदेशात आणि १०.७ टक्के महाराष्ट्रात बलात्काराच्या घटनांची नोंद झालीये.