नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने आज एक महत्वाचा प्रयोग करून दाखवला, हा अतिशय महत्वाचा मानला जात आहे. हवाई दलाच्या एम्ब्रेयर वाहतूक विमानात आकाशातील उड्डाणादरम्यान इंधन भरण्यात आले.
आकाशात उड्डाण करणाऱ्या दुसऱ्या विमानाच्या सहाय्याने एम्ब्रेयर विमानात इंधन भरणा करण्यात आला. यामुळे हवाई दलाच्या सामर्थ्यात वाढ झाली असल्याचं सांगण्यात येत आहे.
#WATCH An Indian Air Force Embraer transport aircraft specialized to conduct Airborne Early Warning and Control (AEW&C) function, successfully carried out Air to Air Refueling (AAR), pic.twitter.com/GFK0H2iGCV
— ANI (@ANI) November 30, 2017
विमानामध्ये उड्डाणावेळीच इंधन भरणे शक्य असल्याने त्यासाठी विमान जमिनीवर उतरवण्याची गरज भासणार नाही. एम्ब्रेयर वाहतूक विमानात पहिल्यांदाच अशाप्रकारे आकाशात उड्डाण सुरु असताना इंधन भरण्यात आले आहे. युद्धसदृश्य परिस्थितीत याचा भारतीय हवाई दलाला मोठा उपयोग होणार आहे.