#DelhiResults2020: 'हे' आहेत दिल्लीतील विजयी उमेदवार

कोणता उमेदवार कोणत्या मतदारसंघातून विजयी...

Updated: Feb 11, 2020, 08:50 PM IST
#DelhiResults2020: 'हे' आहेत दिल्लीतील विजयी उमेदवार title=
फाईल फोटो

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. दिल्लीकरांनी 'आप'ला भरघोस मतं देत पुन्हा एकदा 'आप'वर विश्वास दाखवला आहे. दिल्ली निवडणुकीचा निकाल अद्याप जाहीर व्हायचा आहे. मात्र त्यापूर्वीच आपच्या कार्यालयाबाहेर विजयाचं सेलिब्रेशन सुरु झालंय. आप ६३ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपने ७ जागांवर आघाडी घेतली आहे. दिल्लीत काँग्रेसला एकाही जागेवर खातं उघडला आलेलं नाही. 

दिल्लीकरांनी नव्या राजकारणाला जन्म दिल्याचं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं. दिल्ली निवडणूक निकालाचे कल स्पष्ट झाले असून यात आम आदमी पार्टीला जनतेने एकहाती सत्ता दिल्याचे स्पष्ट होतंय. त्यानंतर 'आप'चे प्रमुख केजरीवाल यांनी दिल्लीकर मतदारांचे आभार मानले आहेत. 

पाहा कोणता उमेदवार कोणत्या मतदारसंघातून विजयी - 

- आंबेडकरनगर - अजय दत्त (आप)
- बल्लीमारान - इमरान हुसेन (आप)
- देवली - प्रकाश जरवाल (आप)
- ग्रेटर कैलाश - सौरभ भारद्वाज (आप)
- हरिनगर - जगदीप सिंह (आप)
- किरारी - रितूराज गोविंद (आप)
- कृष्णानगर - एस. के. बागा (आप)
- मंगोलपुरी - राखी बिर्ला (आप)
- माटिया महल - असिम अहमद खान (आप)
- घोंडा - श्रीदत्त शर्मा (आप)
- कस्तुरबानगर - मदनलाल (आप)
- मदीपूर - गिरीष सोनी (आप)
- मॉडेल टाऊन - अखिलेख पति त्रिपाठी (आप)
- मोतीनगर - शिवचरण गोयल (आप)
- मुस्ताफाबाद - जगदीश प्रधान (भाजप)
- नांगलोई - रघुविन्द्र शौकीन (आप)
- नरेला - शरद कुमार (आप)
- पटेलनगर - हजारी लाल चौहान (आप)
- राजेंद्रनगर - राघव चड्डा (आप)
- रिठाला - मोहिंदर गोयल (आप)
- संगमविहार - दिनेश मोहनिया (आप)
- सीलमपूर - अब्दुल रहमान (आप)
- सीमापुरी - राजेंद्रपाल गौतम (आप)
- शाहदरा - रामनिवास गोयल (आप)
- शालीमार बाग - वंदना कुमारी (आप)
- सुल्तानपुर माजरा - मुकेशकुमार अहलावत (आप)
- त्रिनगर - प्रीती तोमर (आप)
- त्रिलोकपुरी - रोहित कुमार (आप)
- विश्वासनगर - ओमप्रकाश शर्मा (भाजप)
- वाझिरपूर - राजेश गुप्ता (आप)
- आदर्शनगर - पवन कुमार शर्मा (आप)
- बाबरपूर - गोपाल राय (आप)
- बदली - अजेश आयदव (आप)
- बल्लीमारान - इमरान हुसेन (आप)
- बिजवासन - भूपिंदर जून (आप)
- चांदनी चौक - प्रल्हाद सिंह साहनी (आप)
- छत्तरपुर - कर्तारसिंह तन्वर (आप)
- दिल्ली कॅन्टोन्मेंट - विरेंद्ररसिंह कडियान (आप)
- गांधीनगर - अनिल कुमार बाजपाई (भाजप)
- जनकपूरी - राजेश रिशी (आप)
- करोल बाग - विशेष रवि (आप)
- लक्ष्मी नगर - नितीन त्यागी (आप)
- कालकाजी - आतिशी मार्लेना (आप)
- मालविय नगर - सोमनाथ भारती (आप)
- मटियाला - गुलाब सिंह (आप)
- मगरौली - नरेश यादव (आप)
- नवी दिल्ली - अरविंद केजरीवाल (आप)
- ओखला - अमानातुल्लाह खान (आप)
- पालम - भावना गौर (आप)
- पटपडगंज - मनीष सिसोदिया (आप)
- आरकेपुरम -प्रमिला ठोकस (आप)
- राजौरी गार्डन - धनवंती चंदेला (आप)
- रोहतास नगर - जितेंद्र महाजन (भाजप)
- सदर बाजार - सोम दत्त (आप)
- शौकर बस्ती - सतेंद्र जैन (आप)
- रोहिणी - विजेंद्र गुप्ता (आप)
- रिठाला - मोहिंदर गोयल (आप)
- टिळकनगर - जरनेल सिंह (आप)
- तिमारपूर - पंकज पुष्कर (आप)
- उत्तमनगर - नरेश बाल्यान (आप)
- विकासपुरी- मोहिंदर यादव (आप)
- विश्वासनगर - ओम प्रकाश शर्मा (भाजप)
- तुगलकाबाद - साहिराम पहलवान (आप)