व्हिडिओ : सपना चौधरीच्या गाण्यावर 'लेडी सिंघम'नं धरला ताल

आपल्या कामात सतत व्यस्त असणाऱ्या महिला पोलिसांना असं मनसोक्त नाचताना पाहून प्रेक्षकांनीही टाळ्यांसहीत त्यांना दाद दिली

Updated: Apr 4, 2019, 12:19 PM IST
व्हिडिओ : सपना चौधरीच्या गाण्यावर 'लेडी सिंघम'नं धरला ताल title=

नवी दिल्ली : हरियाणवी डान्सर सपना चौधरी आपल्या डान्ससाठी प्रसिद्ध झालीय. भोजपुरी असो की पंजाबी... संपूर्ण बॉलिवूडलाही सपनाच्या गाण्यांनी भूरळ घातलीय. खासकरून 'तेरी आख्यों का यो काजल' जेव्हा जेव्हा वाजतं तेव्हा तेव्हा प्रेक्षकही स्वत:ला थिरकण्यापासून वाचवू शकत नाहीत. असंच काहीसं दृश्य नजरेस पडलं दिल्ली पोलिसांच्या एका कार्यक्रमात... सपनाचं 'तेरी आख्यो का यो काजल' सुरू झालं आणि या गाण्यावर अनेक महिला पोलिसांनीही ताल धरला.

गेल्या शनिवारी दक्षिण दिल्लीमध्ये दिल्ली पोलिसांसाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमातही सपना चौधरीचं गाणं सुरू झालं आणि स्टेजवर उपस्थित महिला पोलिसांनीही ताल धरला. 

एका महिला पोलिसानं यावेळी आयपीएस बेनिता मेरी जेकर यांचा हात पकडून त्यांनाही नाचात सहभागी करून घेतलं. मग, काय आयपीएस अधिकारी स्टेजवर पोहचल्यावर सगळ्याच महिला पोलीस यात सहभागी झाल्या. आपल्या कामात सतत व्यस्त असणाऱ्या महिला पोलिसांना असं मनसोक्त नाचताना पाहून प्रेक्षकांनीही टाळ्यांसहीत त्यांना दाद दिली. 

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांकडून महिला कर्मचाऱ्यांच्या कामाचा गौरव करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.