माज उतरला! होळीच्या दिवशी मेट्रो आणि स्कूटीवरचा अश्लिल स्टंट पडला महागात, दंड भरण्यासाठीही पैसे नाहीत

Trending News : होळीच्या दिवशी मेट्रोत आणि स्कूटीवर अश्लील पद्धतीने रंगपंचमी खेळतानाचा दोन मुलींचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडिओची पोलिसांनी गंभीर दखल घेतली पोलिसांनी या मुलींना 33 हजार रुपायंचा आर्थिक दंड ठोठावला आहे. 

राजीव कासले | Updated: Mar 27, 2024, 07:07 PM IST
माज उतरला! होळीच्या दिवशी मेट्रो आणि स्कूटीवरचा अश्लिल स्टंट पडला महागात, दंड भरण्यासाठीही पैसे नाहीत title=

Trending News : होळीच्या दिवशी दोन तरुणींचा दिल्ली मेट्रोत (Delhi Metro) आणि स्कूटीवर अश्लील हावभाव (Scooter Stunt) करत एकमेकींना रंग लावण्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. होळीचं निमित्त साधून दिल्लीतल्या दोन तरुणींनी धावत्या मेट्रोमध्ये एक व्हिडिओ शूट केला. पण या मुलींचे हावभाव इतके अश्लील होते की हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच संतापले. दिल्ली मेट्रोमध्ये प्रवाशांची गर्दी होती. तरीदेखील या दोन तरुणींनी कसलीही परवा न करता 'अंग लगा दे रे' या गाण्यावर डान्स केला. त्यानंतर याच दोन तरुणींचा स्कूटीवरचा व्हिडिओ देखील व्हायरल (Viral Video) झाला. एका स्कूटीवर या दोन तरुणींनी अश्लिल हावभाव करत एकमेकांना रंग लावण्याचा व्हिडिओ केला.

कोण आहेत त्या मुली?
मेट्रो आणि स्कूटीवर ज्या मुलींनी अश्लिल व्हिडिओ शूट केलाय त्या मुलींची नावं प्रीती आणि विनीता अशी आहेत. तर स्कूटी चालवणाऱ्या तरुणाचं नाव पियुष असं आहे. या मुलींचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी याची गंभीर दखल घेत त्या तिघांवर गुन्हा दाखल केला. तसंच 33 हजार रुपयांचा आर्थिक दंडही ठोठावला. आम्हाला स्टंट करायचा नव्हता तर केवळ रिल बनवायची होती असं स्पष्टीकरण या मुलींनी दिलंय. या मुलींनी कान पकडत माफी मागितली असून दंड भरण्या इतपत आपल्याकडे पैसे नसल्याचंही त्यांनी सांगितलं. 

दिल्ली मेट्रोत व्हिडिओ शूट करताना प्रवाशांनी आक्षेप घेतला, त्यानंतर आपल्यालाही असं करणं चुकीचं असल्याचं वाटल्याचं प्रीतीने म्हटलंय. आम्ही याआधी कधीच असे व्हिडिओ बनवला नव्हता असं तरुणींचं म्हणणं आहे. 

रिल्स बनवण्यासाठी दिल्लीत
यातली प्रीती ही तरुणी मूळची उत्तराखंडमध्ये राहाणारी आहे. केवळ रिल्स बनवण्यसाठी ती दिल्लीत आली. घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे प्रीतीला शिक्षण घेता आलं नाही. तिचे दोन लहान भाऊ असून त्यांच्या शिक्षणाचा खर्च आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी प्रीती छोटी-मोठी कामं करते. दोन वर्षांपासून तीने रिल्स बनवायला सुरुवात केली. आठ महिन्यांपूर्वीच तिची ओळख पियुष नावाच्या तरुणाशी झाली आणि दोघांनी मिळून रिल्स बनवायला सुरुवात केली. 

इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स
प्रितीनचे इंस्टाग्रामवर दोन अकाऊंट्स आहेत. एका अकाऊंटवर 40 हजार तर दुसऱ्या अकाऊंटवर तिचे तब्बल 3 लाख फॉलोअर्स आहेत. यूट्यबरही तिचे दोन चॅनेल्स आहेत. यातल्या एकावर एक लाख तर दुसऱ्यावर साडेआठ लाख सबस्क्राईबर्स आहेत. प्रिती आणि विनीताची ओळख 15 दिवसांपूर्वीच झाली. त्यानंतर प्रिती, पियुष आणि विनीताने एकत्र येत रिल्स बनवण्याचा निर्णय घेतला. 

विनीताचेही लाखो फॉलोअर्स
प्रितीप्रमाणेच विनीताही इन्स्टाग्रामवर रिल्स बनवते. तिच्या पहिल्या व्हिडिओला दोन लाख व्ह्यूज आले. त्यामुळे तीने रिल्स बनवण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान तिची ओळख प्रितीशी झाली. मेट्रो आणि स्कूटीवरचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी या दोघींविरुद्ध गुन्हा दाखल केला. यापुढे आपण असे व्हिडिओ बनवणार नाही अशी शपथ त्यांनी घेतलीय. पण 33 हजार रुपयांचा दंड भरु शकतो इतकी आपली अदयाप कमाई झाली नाही असं त्या सांगतात.