Video : स्कूल बस आणि कारची जोरदार धडक, भीषण अपघातात 6 जणांचा जागीच बळी

Ghaziabad Accident : गाझियाबाद राष्ट्रीय महामार्गावर स्कूल बस आणि कारचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत  6 जणांचा मृत्यू झाला आहे. 

Updated: Jul 11, 2023, 10:56 AM IST
Video : स्कूल बस आणि कारची जोरदार धडक, भीषण अपघातात 6 जणांचा जागीच बळी title=
delhi meerut expressway road accident 6 dead school bus and car Ghaziabad Accident Video viral google trending news

Ghaziabad Accident Video : गाझियाबादमधील दिल्ली मेरठ एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात झाला असून यात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. चुकीच्या बाजूने येणाऱ्या स्कूल बस आणि कारची जोरदार धडक झाली. यात 8 वर्षांचा एक चिमुरड्या गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली मेरठ एक्स्प्रेस वेवरील क्रॉसिंग पोलीस स्टेशन परिसरात ही दुर्घटना घडली आहे. एक्स्प्रेस वे असूनही चुकीच्या बाजूने तेही भरधाव वेगाने बस आली आणि कारला जाऊन धडकली. बस चालकाच्या चुकीमुळे 6 जणांचा नाहक बळी गेला आहे. 

दुर्घटनेनंतर कारची अवस्था पाहून पोलिसांनाही घाम फुटला. कारण अपघातानंतर मृतदेह हे कारमध्येच अडकले होते. पोलिसांनी कटरने कारचा दरवाजा कापून त्यांना बाहेर काढले. एवढंच नाही तर एक मृतदेह हा बसमध्ये अडकला होता. तोही पोलिसांनी काढला आहे. दरम्यान पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. 

कारमधील कुटुंब हे मेरठहून दिल्लीला येतं होतं. या कारमध्ये एकून 8 जण होती त्यातील 6 जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक लहान मुलं आणि एक व्यक्तीला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

 

 दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. 

योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाने ट्विट करत म्हटलं आहे की, गाझियाबाद जिल्ह्यातील रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख आहे. मुख्यमंत्र्यांनी कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला आहे.मृतांच्या आत्म्याला शांती लाभो आणि जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.