ऑफिसला जायला खूप वेळ लागतो म्हणून पहिल्याच दिवशी राजीनामा; दिल्लीतील विचित्र प्रकार

Man Quits Job On First Day: एका चांगलया कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मला लागल्याचं या व्यक्तीने पोस्टच्या सुरुवातीला सांगत आपण पहिल्याच दिवशी नोकरी सोडल्याचंही या व्यक्तीने रेडिटवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 10, 2023, 03:16 PM IST
ऑफिसला जायला खूप वेळ लागतो म्हणून पहिल्याच दिवशी राजीनामा; दिल्लीतील विचित्र प्रकार title=
रेडिटवर केलेल्या पोस्टवरुन चर्चा

Man Quits Job On First Day: बऱ्याच कष्टाने लागलेली नोकरी टीकवण्यासाठी लोक काय काय करतात. मात्र रेडिटवरील एका पोस्टमध्ये एक वेगळेच चित्र पहायला मिळत असून या पोस्टमधील प्रसंग सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या पोस्टमध्ये एका व्यक्तीने आपल्याला ऑफिसला जाताना फार वेळ लागतो असं कारण देत नोकरीच्या पहिल्याच दिवशी राजीनामा दिल्याचं म्हटलं आहे. सोशल मीडियावर यावरुन बरीच उलट सुटल चर्चा सुरु झाली आहे. ईशान्य दिल्लीमध्ये राहणाऱ्या या व्यक्तीने पगार चांगला असल्याने आपण नोकरी स्वीकारल्याचंही म्हटलं आहे. मात्र पहिल्याच दिवशी त्याला ऑफिस फार दूर असल्याचा साक्षात्कार झाला.

पोस्टवर लोक तुटून पडले

रोज गुरुग्राममधील आपल्या ऑफिसला जाणं हे फार जिकरीचं होऊन जाईल असं या व्यक्तीला पहिल्याच दिवशी ऑफिसला पोहोचल्यावर जाणवलं. येण्याजाण्यात खर्च होणारा प्रवासाचा वेळ, ऑफिसचा वेळ या साऱ्यातून स्वत:साठी केवळ 3 तासच फ्री मिळतील असं त्याच्या लक्षात आलं. दुसऱ्या ठिकाणी राहायला जाण्यास पण अडचण असलेल्या या व्यक्तीने आपल्या अनुभव रेडिटवर शेअर केला आहे. त्याने येथील फॉलोअर्सकडून सल्ला मागितला. मग काय नेटकरी या पोस्टवर तुटून पडले आहे.

पोस्टमध्ये काय म्हटलंय?

"एका चांगल्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. मुलाखतीच्या काही राऊण्डनंतर त्यांना कर्मचऱ्यांची गरज असल्याने मला लगेच ऑफर लेटर आलं आणि मी जॉइन झालो. ही माझी पहिलीच नोकरी असल्याने मी फार उत्साही होतो. मात्र ऑफिसला जाताना फार प्रवास करावा लागतोय असं मला जाणवलं. मी दिल्लीच्या ईशान्य भागात (पिंक लाइनला) राहतो आणि नोकरीसाठी मला 'मॉलिसर एव्हेन्यू'मध्ये जावं लागायचं. मी काही आखडेमोड केल्यानंतर मला असं जाणवलं की मला घरात केवळ 3 तास मिळतील असं जाणवलं. तसेच प्रवासाचा खर्च सुद्धा 5 हजारांपर्यंत असल्याचं लक्षात आलं. मला दुसरीकडे राहायला जाता येणार नाही," असं या व्यक्तीने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

या पोस्टवर 400 हून अधिक अपव्होट्स आले आहेत. अनेकांनी या पोस्टवर कमेंट करुन आपले अनुभव नोंदवले आहेत. काहींनी हा निर्णय फारच टोकाचा असल्याचंही म्हटलं आहे. 

या पोस्टवरील कमेंट्स वाचून या व्यक्तीने आपली प्रतिक्रिया नोंदवता, "मी चुकीचा निर्णय घेतला. मला ठाऊक नव्हतं प्रत्येकजण एवढा प्रवास करतो. चर्चा करण्यासाठी माझ्याबरोबर कोणी नव्हतं म्हणून मला मी मला जे योग्य वाटलं तो निर्णय घेतला. मी या पुढे अधिक योग्य निर्णय घेईन," असं म्हटलं.