Mini Lockdown : 31 डिसेंबर पार्टीसाठी मित्राच्या घरी जायचंय? जाणून घ्या नियमांबाबतच्या सर्व प्रश्नांची उत्तरं

तुमच्या मनातही काही प्रश्न आहेत का...? 

Updated: Dec 30, 2021, 10:47 AM IST
Mini Lockdown : 31 डिसेंबर पार्टीसाठी मित्राच्या घरी जायचंय? जाणून घ्या नियमांबाबतच्या सर्व प्रश्नांची उत्तरं  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

नवी दिल्ली : देशात कोरोनानं पुन्हा थैमान घालण्यास सुरुवात केली आणि पाहता पाहता प्रत्येक राज्यात काही निर्बंध लागू करण्यात आले. कमी- जास्त प्रमाणात प्रत्येक राज्यानं पुन्हा एकदा कोरोना प्रतिबंधात्मक नियमांवर जोर दिला. (Coronavirus)

असं असतानाही काही मंडळींनी फिरायला जाण्यासाठीचे बेत आखले. कोणी मित्राकडे तर कोणी आणखी कुठं जायचा बेत आखला. 

तिथून शासनानं मात्र नियमांची अंमलबजावणी झालीच पाहिजे असं सांगत सर्वांनाच पेचात टाकलं. दिल्लीत तर थेट मिनी लॉकडाऊनच लागू करण्यात आला. 

परिणामी आता दिल्लीकरांच्या मनात काही प्रश्न घर करत आहेत. त्याच प्रश्नांची उत्तरं पुढे दिली आहेत. 

रेस्टॉरंटमध्ये जाता येणार? 
हो. पण, रेस्टॉरंट क्षमतेच्या 50 टक्के संख्येपर्यंतच्याच उपस्थितीला परवानगी असेल. रात्री 10 वाजता ही आस्थापनं बंद करण्यात येतील. 

नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मित्रांच्या घरी जाता येणार ? 
हो जाता येईल. खासगी स्वरुपाच वर्षाचा शेवट करण्यात काहीच वावगं नाही. पण, रात्री 10 वाजल्यानंतर बाहेर ये-जा करता येणार नाही. 

सहलीसाठी कुठे जाता येईल? 
नाही, कारण उद्यानं आणि सहलीजोगी ठिकाणं काही प्रमाणात बंदच राहतील. 

नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी बाहेर जाता येईल ? 
हो. कारण दिल्लीमध्ये वीकेंड कर्फ्यू नाही. पण, नाईट कर्फ्यू असल्यामुळं काही नियम लागू असतील.