६५ वर्षीय महिलेवर बलात्कार, अल्पवयीन मुलगा अटकेत

महिलांवर होणारे अत्याचार काही थांबताना दिसत नाहीये. दररोज महिलांवर अत्याचार झाल्याचं वृत्त समोर येत आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Dec 28, 2017, 11:22 PM IST
६५ वर्षीय महिलेवर बलात्कार, अल्पवयीन मुलगा अटकेत title=
Representative Image

नवी दिल्ली : महिलांवर होणारे अत्याचार काही थांबताना दिसत नाहीये. दररोज महिलांवर अत्याचार झाल्याचं वृत्त समोर येत आहे.

धक्कादायक घटना

आता एका ६५ वर्षीय महिलेवर अल्पवयीन मुलाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

दिल्लीमध्ये घडला प्रकार

दक्षिण दिल्लीतील नेब सराय येथे एका ६५ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी १५ वर्षीय मुलाला अटक करण्यात आली आहे.

आरोपीने पीडित महिलेला दिली होती धमकी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही पीडित महिला एका फार्म हाऊसमध्ये काम करते. एकेदिवशी तिने पोलिसांना कॉल करुन माहिती दिली की, १५ दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलाने माझ्यावर बलात्कार केला होता. तसेच या प्रकरणी कुठेही न बोलण्याची धमकीही त्याने दिली होती. या महिलेने घाबरून आणि अपमान होण्याच्या भीतीने या प्रकरणी कुणालाही काहीही सांगितलं नव्हतं.

आरोपी पुन्हा पीडित महिलेच्या घरी

महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, आरोपी मुलगा हा २३ डिसेंबर रोजी पुन्हा तिच्या घरी आला होता. ज्यावेळी मी दरवाजा उघडला नाही त्यावेळी त्याने दरवाजा जोरदार ठोठावण्यास सुरुवात केली. तसेच दरवाजाही तोडण्याची धमकी दिली. यावेळी पीडित महिलेने आराडा-ओरड करण्यास सुरुवात केली आणि तिचा आवाज ऐकूण शेजारील नागरिक धावत आला. त्यानंतर आरोपीने तेथून पळ काढला.

आरोपीची बालसुधारगृहात रवानगी

या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी मुलाला पकडून बालसुधारगृहात त्याची रवानगी करण्यात आली आहे. आरोपी मुलाचे वडील हे सुरक्षा गार्ड आहेत.