'२००८ गुजरात ब्लास्ट'च्या मास्टरमाइंडला अटक

इंडियन मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनेचा कुख्यात दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. बराच वेळ सुरू असलेल्या चकमकीनंतर तो पोलिसांच्या ताब्यात आला. अब्दुल सुभान कुरेशी असे या दहशतवाद्याचे नाव आहे.

Updated: Jan 22, 2018, 12:37 PM IST
 '२००८ गुजरात ब्लास्ट'च्या मास्टरमाइंडला अटक title=

नवी दिल्ली : इंडियन मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनेचा कुख्यात दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. बराच वेळ सुरू असलेल्या चकमकीनंतर तो पोलिसांच्या ताब्यात आला. अब्दुल सुभान कुरेशी असे या दहशतवाद्याचे नाव आहे.

मोस्ट वॉंटेड दहशतवादी

 इंडियन मुजाहिद्दीन आणि सिमी संघटनेशी तो जोडला गेला आहे. देशातील सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यांतील मोस्ट वॉंटेड दहशतवादी आहे.

दिल्ली गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली आहे.

हल्ल्यात सहभाग 

अहमदाबाद, दिल्ली आमि बंगळूरमध्ये झालेल्या ब्लास्टमध्ये अब्दुल कुरेशीचा सहभाग होता. २००६ मध्ये झालेल्या मुंबई ट्रेन ब्लास्टमधील सही संशयित आरोपी आहे.