Porn पाहिल्यानंतर लहान मुलांचा शोध, निर्जनस्थळी नेऊन बलात्कार आणि हत्या; 30 मुलं ठार करणारा Serial Killer

Crime News: रवींद्र कुमार याने 2008 ते 2015 दरम्यान आपण 30 अल्पवयीन मुलांवर बलात्कार (Rape) करत हत्या (Murder) केली असल्याची कबुली दिली आहे. यानंतर दिल्ली कोर्टाने (Delhi Court) त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.   

शिवराज यादव | Updated: May 25, 2023, 03:56 PM IST
Porn पाहिल्यानंतर लहान मुलांचा शोध, निर्जनस्थळी नेऊन बलात्कार आणि हत्या; 30 मुलं ठार करणारा Serial Killer title=

Crime News: अल्पवयीन मुलांचं अपहरण करुन लैंगिक अत्यातार आणि हत्या करणाऱ्या आरोपीला दिल्ली कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 2008 ते 2015 दरम्यान, त्याने तब्बल 30 मुलांचं अपहरण करत हत्या केली आहे. त्याने आपण केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात 2008 ते 2015 या काळात आपण हे सर्व गुन्हे केल्याचं त्याने सांगितलं आहे. यामधील काही प्रकरणात त्याने हत्या केल्यानंतर मृतदेहावरही लैंगिक अत्याचार केले होते. तब्बल सहा वर्षं केलेले हे गंभीर गुन्हे आणि त्यानंतर आठ वर्षं चाललेला खटला यानंतर अखेर शनिवारी दिल्ली कोर्टाने त्याला दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. 

रवींद्र हा दिल्लीत मजूर म्हणून काम करत होता. त्याला ड्रग्जचं व्यसन होतं. पॉर्न फिल्म पाहिल्यानंतर तो लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करुन त्यांची हत्या करण्यासाठी त्यांच्या शोधात बाहेर पडत असे. 2008 मध्ये सर्वात प्रथम त्याच्या गुन्ह्यांना सुरुवात झाली. त्यावेळी तो फक्त 18 वर्षांचा होता. नंतर ही गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत गेली आणि 2015 पर्यंत त्याने तब्बल 30 मुलांची हत्या केली. 

नेमकं प्रकरण काय?

2008 मध्ये रवींद्र उत्तर प्रदेशच्या कासगंज येथून नोकरीच्या शोधात दिल्लीत आला. त्याचे वडील प्लंबर तर आई मोलकरणीचं काम करत होती. दिल्लीत आल्यानंतर काही वेळातच रवींद्र ड्रग्जच्या आहारी गेला. यादरम्यान त्याच्या हाताला काही पॉर्न फिल्मच्या व्हिडीओ कॅसेट लागल्या.

पोलिसांच्या माहितीनुसार, रवींद्र दिवसभर मजूर म्हणून काम करत असे आणि संध्याकाळी नशेत बुडालेला असे. रात्री 8 ते मध्यरात्रीपर्यंत तो आपल्या झोपडीत झोपत असे. नंतर तो लहान मुलांच्या शोधात बाहेर पडत असे. 

कधीकधी रवींद्र लहान मुलांच्या शोधात 40 किमीपर्यंत चालत जात असे. बांधकामांच्या ठिकाणी झोपडपट्टीत तो लहान मुलांचा शोध घेत असे. लहान मुलांना निर्जनस्थळी नेण्यासाठी तो त्यांना 10 रुपये आणि चॉकलेटंच आमिष दाखवत असे. त्याचा सर्वात लहान पाडित सहा वर्षांचा असून, मोठा पीडित 12 वर्षांचा आहे. 

2008 मध्ये दिल्लीमध्ये एका मुलीचं अपहरण करुन त्याने हत्या केली. पण तो दरवेळी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटून जायचा. यामुळे त्याचं मनोबल वाढलं होतं आणि तो गुम्हे करताना मागे पुढे पाहत नव्हता. पीडित आपली ओळख जाहीर करतील या भीतीने तो त्यांची हत्या करत असे. आपण पकडले जाऊ या भीतीने तो कधीही गुन्हा केलेल्या ठिकाणी पुन्हा गुन्हा करण्यासाठी जात नसे.

2015 मध्ये दिल्लीचे डीसीपी विक्रमजीत सिंग यांनी सांगितलं होतं की, जेव्हा रवींद्रला पकडलं तेव्हा तो आपल्या प्रत्येक गुन्ह्याची सविस्तरपणे माहिती देत होती. त्याने पोलिसांना गुन्हा केलेल्या एकूण 15 जागाही दाखवल्या होत्या. दरम्यान 2015 मध्ये पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर तब्बल आठ वर्षं त्याच्याविरोधात खटला चालला. कोर्टाने अखेर त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.