भाजप सर्वात मोठा पक्ष तरीही INDIA ची सत्ता येणे शक्य? पंतप्रधानांचा चेहरा कोण? पवारांनी सर्वच सांगितलं!

Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकांचे कल आता हाती आले आहेत. भाजपप्रणित एनडीएला 292 जागा मिळाल्या आहेत. भाजपने बहुमताचा आकडा जरी गाठला असला तरी सत्ता स्थापनेसाठी भाजपला मित्रपक्षाची मदत घ्यावी लागणार आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 5, 2024, 01:00 PM IST
भाजप सर्वात मोठा पक्ष तरीही INDIA ची सत्ता येणे शक्य? पंतप्रधानांचा चेहरा कोण? पवारांनी सर्वच सांगितलं! title=
Day after Loksabha election poll results Sharad Pawar press conference

Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकांचे कल आता हाती आले आहेत. भाजपप्रणित एनडीएला 292 जागा मिळाल्या आहेत. भाजपने बहुमताचा आकडा जरी गाठला असला तरी सत्ता स्थापनेसाठी भाजपला मित्रपक्षाची मदत घ्यावी लागणार आहे. तर, इंडिया आघाडीने या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे. इंडिया आघाडीने 234 जागा मिळवल्या आहेत. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी इंडिया आघाडीला काहीच जागा कमी पडत आहेत. अशा स्थिथीत इंडिया आघाडी सत्ता स्थापनेचा दावा करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसंच, इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? या प्रश्नांचीही चर्चा आहे. देशात राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच शरद पवार आणि नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे या दिल्लीत पोहोचल्या आहेत. दिल्लीत शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली आहे. 

शरद पवारांनी आज पत्रकार परिषदेत इंडिया आघाडीबद्दल भाष्य केलं आहे. अद्याप आमची सरकार स्थापनेबाबत कोणतीही चर्चा झालेली नाहीये. खरगेंसोबत फोनवर बोलणं झालं असून आज आमची मिटिंग आहे. संध्याकाळी सहा वाजता आमची पहिली मिटिंग आहे. त्या मिटिंगमध्ये काय रणनिती असेल हे ठरेल त्यानुसार आगामी काळात बैठक होईल. त्यामुळं पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल, यावर आत्ता बोलणं योग्य राहणार नाही. संख्याबळ पाहून रणनीती ठरवणार आहे. 

नितीश कुमार एनडीएसोबतच राहणार आहेत, असं मला मीडियाच्या माध्यमातून समजलं आहे. आम्ही नितीश कुमारांना संपर्क करण्याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाहीये. पुढच्या बैठकीत आम्ही याबाबत रणनिती ठरवू. सत्ता स्थापनेबाबत आम्ही अजूनही चर्चा केलेली नाहीये. आजच्या बैठकीत आम्ही पुढची रणनिती ठरवू. कुणाला संपर्क करायचा याबाबत अद्याप चर्चा झालेली नाहीये, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. 

शरद पवार पुढे म्हणाले आहेत की, जनतेच्या मनात नरेंद्र मोदी यांच्याबद्दल नाराजी आहे. शेतकऱ्यांच्या मनात मोदींबद्दल नाराजी दिसून आली.