संघाच्या ज्येष्ठ नेत्याची हत्या करण्याचा दाऊद गँगचा कट

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ नेत्यांची हत्या करण्याचा कट दाऊद इब्राहिमच्या टोळीनं आखल्याचं उघड झालंय.

Updated: Jan 20, 2019, 05:37 PM IST
संघाच्या ज्येष्ठ नेत्याची हत्या करण्याचा दाऊद गँगचा कट title=

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ नेत्यांची हत्या करण्याचा कट दाऊद इब्राहिमच्या टोळीनं आखल्याचं उघड झालंय. दिल्ली पोलिसांनी दाऊदच्या तीन गुंडांना नुकतीच अटक केली होती. त्यांच्या चौकशीत ही बाब उघड झाली आहे. दक्षिण भारतात हा घातपात घडवण्याचा दाऊद टोळीचा कट होता.

दुबईमधून आलेल्या एका टेलिफोन संभाषणातून या कटाचा छडा पोलिसांना लागला होता. त्यानुसार संघ आणि हिंदुत्ववादी नेत्यांच्या हत्या घडवून देशात दंगली घडवून आणण्याचा डाव दाऊद टोळीनं आखला होता. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून पाकिस्तानात दडून बसलेल्या दाऊदचा निकटवर्ती अफगाणी नागरिक असलेला मोहम्मद आणि रियउजिद्दीन शेख यांना हत्यांरांसह रंगेहाथ पकडलं. त्यानंतर केरळमधून तस्लिम नावाच्या मुख्य आरोपीलाही बेड्या ठोकण्यात आल्या.