नवी दिल्ली : दारूल उलूम देवबंद यांनी मुस्लिम महिलांसाठी एक धक्कादायक फतवा जारी केला आहे. एएनआय वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, दारूल उलूम देवबंदच्या फतव्यामध्ये असे म्हटले आहे की, मुसलमान महिलांनी केस कापण्याची आणि आयब्रो करणे हे धर्मविरोधी आहे. दारूल उलूम देवबंदच्या फतवा विभागाच्या मौलाना लुटफुरुहमान सादिक कासमी म्हणाले की, हा फतवा याआधीच जाहीर करायला हवा होता.
Darul-Uloom Deoband has issued fatwa against Muslim women cutting their hair & grooming their eyebrows: Maulana Kazmi of Darul-Uloom Deoband pic.twitter.com/QTdLDriq05
— ANI (@ANI) October 7, 2017
सहारनपूर येथील एका माणसाने दारूल उलूम देवबंद यांना विचारले की इस्लाम स्त्रियांना केस कापणे आणि भुवया करण्यास मान्यता देतो का ? मी माझ्या पत्नीस असे करण्याची परवानगी देऊ का? या व्यक्तीच्या प्रश्ना नंतर, दारू उलुम यांनी फतवा जाहीर केला.
या फतव्यामध्ये स्पष्टपणे सांगितले गेले आहे की," इस्लाम महिलांनी आयब्रो करणे किंवा केस कापणे हा धर्मा विरुद्ध आहे. जर एखाद्या स्त्रीने असे केले तर ती इस्लामच्या नियमांचे उल्लंघन करीत आहे.
इस्लाममधील स्त्रियांवर १० निर्बंध आहेत यामध्येच केस कापणे आणि आय ब्रो करणे याचाही समावेश आहे, असा तर्क हा फतवा जारी करण्यामागे असल्याचे सांगण्यात आले आहे. लांब केस स्त्रियांच्या सौंदर्याचा भाग आहे. अगदी अडचणीच्या काळातच इस्लाम केस कापण्याची परवानगी देतो. कोणत्याही योग्य कारणाशिवाय केस कापण्याची परवानगी इस्लाम देत नसल्याचे त्यांनी सांगितले. दारुल उलूम देवबंद यांच्याबद्दल मुस्लिमांच्या मनात विशेष स्थान आहे असे म्हटले जाते. मी जगात इस्लामची मौलिकता कायम राखण्यास काम करत असल्याचे दारूल उलुम देवबंद यांनी सांगितले. या विचारधारेने प्रेरित झालेल्या मुस्लिमांना देवबंदी म्हटले जाते.