विराटला प्रपोज करणारी महिला खेळाडू झाली ट्रोल

इंग्लंडची महिला क्रिकेटर डेनियल वॅटने भारतीय महिला किक्रेट टीमच्या विरोधात टी-20 सामन्यामध्ये 52 बॉलमध्ये शतक ठोकलं. या सामन्यात इंग्लंडचा ७ विकेटने विजय झाला. महिला टी-20 इंटरनॅशलमध्ये हे पहिलं सर्वात जलद शतक आहे. वॅटच्या या खेळीनंतर तिच्याच एका सह खेळाडूने तिला ट्रोल केलं.

shailesh musale Updated: Mar 27, 2018, 01:23 PM IST
विराटला प्रपोज करणारी महिला खेळाडू झाली ट्रोल title=

मुंबई : इंग्लंडची महिला क्रिकेटर डेनियल वॅटने भारतीय महिला किक्रेट टीमच्या विरोधात टी-20 सामन्यामध्ये 52 बॉलमध्ये शतक ठोकलं. या सामन्यात इंग्लंडचा ७ विकेटने विजय झाला. महिला टी-20 इंटरनॅशलमध्ये हे पहिलं सर्वात जलद शतक आहे. वॅटच्या या खेळीनंतर तिच्याच एका सह खेळाडूने तिला ट्रोल केलं.

सर्वात जलद शतक

डेनियल वॅटने भारतीय महिला टीम विरोधात रविवारी खेळल्या गेलेल्या एका टी-20 मध्ये 52 बॉलमध्ये शतक करत जलद शतक ठोकण्याचा रेकॉर्ड आपल्या नावे केला. विराट कोहलीने देखील 52 बॉलमध्ये शतक झळकावलं आहे. वनडेमध्ये देखील विराटने 52 बॉलमध्ये शतक झळकावलं आहे. केट क्रॉसने दोघांच्या रेकॉर्डबाबत ट्विट करत म्हटलं की, काय तुझा नशिबावर विश्वास आहे? याला वॅटने देखील रिट्विट केलं. सोशल मीडियावर विराटला प्रपोज केल्यामुळे ती चर्चेत आली होती.

वॅट झाली ट्रोल

या ट्विटनंतर हजारो क्रिकेट फॅन्सने यावर प्रतिक्रिया दिली. काही जणांनी तर वॅटला प्रपोज देखील केलं. वॅटने विराटला काही दिवसांपूर्वी प्रपोज केलं होतं पण विराट अनुष्कासोबत रिलेशनशीपमध्ये होता. काही दिवसांपूर्वीच विराट आणि अनुष्काने विवाह देखील केला आहे.