'हे' धोकादायक अ‍ॅप्स तुम्हाला घालतील गंडा, क्षणार्धात Bank Account होईल रिकाम

Malicious Apps : गुगल प्ले स्टोअरवर (Google play Store) लाखो अँड्रॉइड अॅप्स (Android Apps) उपलब्ध आहेत. यातील अनेक अॅप्स आपण आपल्या फोनमध्ये इन्स्टॉले केले आहेत. हे अॅप्स आपली अनेक कामे सोपी करत असतात.

Updated: Dec 5, 2022, 08:59 PM IST
'हे' धोकादायक अ‍ॅप्स तुम्हाला घालतील गंडा, क्षणार्धात Bank Account होईल रिकाम title=

Malicious Apps : आपल्या स्मार्टफोनमध्ये (SmartPhone) आपण अनेक अ‍ॅप्स (Apps) डाऊनलोड करत असतो. तर काही आपल्याकडून नकळत डाऊनलोड होत असतात. यातील काही अ‍ॅप्स आपली वैयक्तिक माहिती चोरत असते. या चोरीच्या माहितीमुळे आपल्याला अनेकदा गंडा बसण्याचीही शक्यता असते. अशा अनेक घटना घडल्या देखील आहेत. त्यामुळे जर तुम्ही असे अ‍ॅप्स डाऊनलोड केले असतील तर आताच डिलीट करा, नाहीतर तुम्ही देखील अशा घटनांना बळी पडाल. 

गुगल प्ले स्टोअरवर (Google play Store) लाखो अँड्रॉइड अ‍ॅप्स (Android Apps) उपलब्ध आहेत. यातील अनेक अ‍ॅप्स आपण आपल्या फोनमध्ये इन्स्टॉले केले आहेत. हे अ‍ॅप्स आपली अनेक कामे सोपी करत असतात. त्यामुळे आपण हे अ‍ॅप्स डाऊनलोड करत असतो. मात्र काही अ‍ॅप्सना आपल्यासाठी धोकादायकही ठरू शकतात. अशा धोकादायक अ‍ॅप्सचा शोध देखील लागला आहे. त्यामुळे तुम्ही जर इन्स्टॉले केले असतील तर आताच डिलीट करा. 

कोणते अ‍ॅप्स आहेत?

सायबर सिक्युरिटी रिसर्च सेंटरच्या अहवालानुसार, Google Play Store वर तीन धोकादायक अ‍ॅप्सची (Android Apps) ओळख पटली आहे. हे अ‍ॅप्स वापरकर्त्यांचा डेटा चोरू शकतात. तसेच सायबर हल्लेखोरांना गुप्तपणे फोन ऑपरेट करू देतात. या अ‍ॅप्सचे नाव लेजी माउस (Lazy Mouse), टेलीपैड (Telepad), पीसी कीबोर्ड (PC Keyboard) आहे. हे तिन्ही अॅप्स रिमोट माउस आणि कीबोर्ड अ‍ॅप्स आहेत, जे वापरकर्त्याला सर्व्हरशी कनेक्ट करण्याची आणि फोनसह माउस आणि कीबोर्ड वापरण्याची परवानगी देतात.

इतक्या वेळा डाऊनलोड

वरील तीन अ‍ॅप्स (Android Apps) गुगल प्ले स्टोअरवर खूप लोकप्रिय आहेत. तिन्ही 20 लाखांहून अधिक वेळा डाउनलोड केले गेले आहेत. हे अ‍ॅप्स वापरणाऱ्या युजर्सना नेहमीच धोका असतो. त्यांच्या खात्यातून पैसे देखील गायब होऊ शकतात, कारण हे अ‍ॅप्स वैयक्तिक आणि आर्थिक माहिती देखील चोरू शकतात. त्यामुळे कोणताही धोका टाळण्यासाठी युजर्सनी हे तीन अ‍ॅप्स तात्काळ आपल्या फोनमधून डिलीट करावेत.

जर तुम्ही हे अ‍ॅप्स (Android Apps) डाऊनलोड केले असतील तर आताच स्मार्टफोनमधून डिली करा. तसेच फ्रॉडचा बळी पडण्यापासून स्वत:च वाचा.