मुंबई : येत्या २४ तासात तुफान चक्रीवादळ येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. भारताच्या पूर्व किनारपट्टीतील राज्यांनी चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. 'अम्फान' चक्रीवादळ हे पूर्व किनार पट्टीवर धडकणार आहे. या वादळाचा वेग ताशी ५५-६६ किमी असणार आहे. आज शनिवारी सायंकाळपर्यंत बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ निर्माण होण्याचा अंदाज आहे. मासेमारी करण्यासाठी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्याता आला आहे.
चक्रीवादळ प्रणाली 'डिप्रेशन' वरुन 'दीप डिप्रेशन' पर्यंत विकसित होते आणि मग या चक्रीवादळाला मोठा वेग प्राप्त होते. हे वादळ ताशी ७५-८५ किमी वेगाने येते. तसेच या वादळाच्या वेग मर्यादेत मोठी वाढ होऊन ते ९५ किमी प्रतितास वेगापर्यंत जाऊ शकते.
हे तुफान चक्रीवादळ ओडिशा किनाऱ्यापासून पारादीपच्या दक्षिणेस ११०० किमी दक्षिणेस, दिघाच्या दक्षिणेस १२५० किमी दक्षिणेस आणि बांग्लादेशच्या किनाऱ्यापासून खेपूपाराच्या १३३० किमी दक्षिण-पश्चिम येथे केंद्रीत होऊ शकते. येत्या २४ तासात दुपारी १२ वाजेपर्यंत 'चक्रवाती वादळ' आणि अधिक तीव्रतेचे चक्रीवादळ वादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
समुद्राची स्थिती अत्यंत वाईट असण्याची शक्यता आहे. समुद्र अधिक खवलेल्या असेल. १८ मेपासून आंध्र किनारपट्टी आणि ओडिशा-पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला धोका आहे. त्यामुळे मासेमारी करण्यासाठी समुद्रात जाऊ नका, असा इशारा मच्छिमारांना देण्यात आला आहे. जे समुद्रात गेले आहेत. त्यांनी 17 मे पर्यंत समुद्रातून बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अंदमान आणि निकोबार बेटांवर आज आणि उद्या हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आह., तर ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये १८ मे रोजी मुसळधार पाऊस आणि १९ आणि २० मे रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अॅम्फान या चक्रीवादळविषयी हवामान कार्यालयाने१४ मे रोजी सुरक्षा बल आणि आठ राज्यांचा सतर्क राहण्याचा इशारा देताना अर्लट राहा असे म्हटले आहे.