अविवाहित मुलींना जाळ्यात अडकवणाऱ्या सुंदर मुलांची टोळी... तरुणींनो सावधान राहा

तरुणींनो लग्नासाठी ऑनलाईन नोंदणी करताय, सुंदर मुलांची टोळी समोर आली, तर मुलींनो राहा सावधान..   

Updated: May 26, 2022, 05:20 PM IST
अविवाहित मुलींना जाळ्यात अडकवणाऱ्या सुंदर मुलांची टोळी... तरुणींनो सावधान राहा title=

मुंबई : अविवाहित मुली, एकट्या राहणाऱ्या महिलांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी आतापर्यंत अनेक घडल्या आहेत.  उत्तर प्रदेशच्या सायबर क्राईम पोलिस अधीक्षक (एसपी) प्रोफेसर त्रिवेणी सिंह यांनी लोकांना "सायबर नवरदेव" बद्दल जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, डिजिटल प्लॅटफॉर्मवर काही लोक त्यांची बनावट प्रोफाइल बनवत आहेत. अविवाहित मुली आणि महिलांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांची मोठी फसवणूक करत आहेत. अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

सिंग म्हणाल्या की, उत्तर प्रदेश सायबर क्राइम पोलिसांनी अशा अनेक प्रकरणांचा पर्दाफाश केला आहे. यामध्ये नायजेरियन किंवा विवाहित लोक एखाद्या सुंदर व्यक्तीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करतात, स्वतःला बॅचलर असल्याचा दावा करतात. तरुणींना आपल्या जाळ्यात अडकवतात.

त्यानंतर महिलांची फसवणूक करतात. महिलांची फसवणून करणारे लोक विमानतळावर मौल्यवान वस्तू हरवली आहे, अपघात झाला आहे, आजारी असल्याचं कारण सांगत महिला आणि त्यांच्या कुटुंबियांकडून मोठी रक्कम उकळतात.

सिंग यांच्या माहितीनुसार,  हे लोक बहुतेक ज्य मुलींचे वय असूनही लग्न झाले नाही आणि त्यांच्या लग्नात आता अडथळे येत आहेत किंवा ज्या मुली लग्न करून परदेशात स्थायिक होऊ इच्छितात... अशा मुलींचा  आपल्या जाळ्यात अडकवतात. 

त्या पुढे  म्हणाले, तुम्ही तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या लग्नाच्या ऑनलाइन किंवा ऑफलाइन जाहिराती पाहत असाल तर सावधान व्हा. सायबर ठगांनी आता लग्नाच्या नावाखाली फसवणूकही सुरू केली आहे. आतापर्यंत देशातील महानगरांमध्ये अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

सिंग म्हणाल्या की, सायबर गुन्ह्यांना बळी पडलेल्या लोकांनी तात्काळ 1930 वर संपर्क साधून त्यांच्या तक्रारी नोंदवाव्यात. सायबर गुन्हे रोखण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी विशेष पुढाकार घेतला आहे. 

उत्तर प्रदेशात 18 सायबर पोलीस स्टेशन उघडण्यात आले आहेत. पीडितांच्या मदतीसाठी लखनऊ मुख्यालयात 48 तज्ञ लोकांची टीम तयार करण्यात आली आहे. त्यामुळे ऑनलाईन कोणत्याही मुलाची ओळख करण्याआधी प्रत्येक मुलीवे विचार करायला हवा.