कच्चे तेल स्वस्त! मात्र भारतीयांसाठी Petrol-Diesel महागच, हे आहे त्यामागचे कारण

Petrol-Diesel Price : मागील आठवडाभरापासून कच्चा तेलाच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. मात्र तरीही पेट्रोलियम कंपन्यांनी दर कपातीबाबत हात आखडता घेतला आहे. यामुळे ग्राहकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: May 12, 2023, 08:18 AM IST
कच्चे तेल स्वस्त! मात्र भारतीयांसाठी Petrol-Diesel महागच, हे आहे त्यामागचे कारण  title=
Petrol-Diesel Price on 12 May 2023

Petrol-Diesel Price on 12 May 2023 : गेल्या आठ दिवसांत कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली आहे. तेलाच्या किमती $75 वरून $71 वर घसरल्या आहेत. यामध्ये ब्रेंट क्रूडची (crude oil price) किंमत प्रति बॅरल $1 पेक्षा जास्त घसरून $ 75.36 वर आली आहे. तर WTI दर देखील घसरला असून प्रति बॅरल $71.30 वर चालू आहे. मात्र कच्चे तेल स्वस्त झाले असले तरी भारतीयांना सर्वात महाग इंधन (Expensive fuel) खरेदी करण्याची वेळ आली आहे. कच्चे तेल स्वस्त (Crude oil cheap) झाल्याने पेट्रोल आणि डिझेलमध्ये दर कपात करताना कंपन्यांनी हात आखडता घेतला आहे. कारण आज (12 मे 2023) ही कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) स्थिर ठेवले आहेत. परिणामी 1 लीटर पेट्रोल आणि डिझेलसाठी आता किती पैसे मोजावे लागतील ते जाणून घ्या....

देशातील तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel Price) किमती अपडेट करतात. आज जाहीर झालेल्या यादीनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या एक वर्षापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शेवटचा बदल 22 मे रोजी झाला होता. त्यानुसार मुंबईत आजचा एक लिटर पेट्रोलचा दर 106.31 रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल 96.65 रुपये आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलची किंमत 102.63 रुपये आहे. कोलकातामध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 106.03 रुपये आहे. तर मुंबईत आज (12 मे 2023) शुक्रवारी डिझेलचा दर 94.27 रुपये इतका राहिला. दिल्लीत डिझेल 89.82 रुपये आहे. तर चेन्नईमध्ये 94.24 रुपये आणि कोलकातामध्ये 92.24 रुपये प्रति लिटर आहे. 

वाचा : राज्यपाल नियुक्त 12 आमदार प्रकरणावर आज सुनावणी

अमेरिकेत तेलाच्या किमतीत अस्थिरता

अमेरिकेतील इंधनाच्या मागणीमुळे सुरुवातीच्या आशियाई व्यापारात तेलाच्या किमतीत वाढ झाली. ब्रेंट क्रूड फ्युचर्स 26 सेंट्स किंवा 0.34 टक्क्यांनी वाढून $76.67 प्रति बॅरल झाले. तर यूएस क्रूड फ्युचर्स 28 सेंटने वाढून $72.84 वर पोहोचले.

दररोज सकाळी नवे दर जाहीर

देशातील तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अपडेट करतात. किंमतींमध्ये काही बदल असल्यास पेट्रोलियमच्या वेबसाइटवर अपडेट करतात. जर तुम्हाला तुमच्या शहराची किंमत जाणून घ्यायची असेल, तर तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत वेगवेगळ्या प्रकारे जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला तेल विपणन कंपन्यांच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल किंवा एसएमएस पाठवावा लागेल. जर तुम्ही इंडियन ऑइलचे ग्राहक असाल तर RSP सह 9224992249 वर एसएमएस पाठवू शकता आणि त्यानंतर शहर कोड आणि तुम्ही BPCL ग्राहक असल्यास, RSP लिहून 9223112222 वर एसएमएस पाठवू शकता.