Crime News : हत्या आणि आत्महत्येच्या (Suicide) एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी तपासासाठी पोहोचलेल्या पोलिसांनी (Police) केलेल्या कृत्याने परिसरात संताप व्यक्त होतोय. चारित्र्याच्या संशयावरुन एका व्यक्तीने आपल्या पत्नीचं नाक कापलं. त्यानंतर मुलीची हत्या करत त्याने स्वत:ही आत्महता केली. या घटनेने परसिरात एक खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. पण पोलिसांच्या वर्तणुकीने संतापाचं वातावरण पसरलं आहे. कानपूरमधल्या हनुमान बिहार (Bihar) इथं राहाणाऱ्या छोटूचं 14 वर्षांपूर्वी रुखसानाशी लग्न झालं. छोटू आणि रुखसानाला तीन मुलं आहेत. पण पती-पत्नीमध्ये सातत्याने वाद होत असतं. याच कारणाने रुखसाना मुलांना घेऊन वेगळं राहू लागली.
काही दिवसांपूर्वी नातेवाईकांच्या मध्यस्थीने दोघं पुन्हा एकत्र राहू लागले. घटनेच्या दिवशी छोटू आणि रुखसानामध्ये पुन्हा वाद झाला. छोटूचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. याचा राग त्याच्या डोक्यात होता. दोघांमध्ये भांडणं झाल्यावर रागाच्या भरात छोटूने ब्लेडने पत्नीचं नाक कापलं त्यानंतर त्याने आपल्या 12 वर्षांच्या मुलीची गळ्या दाबून हत्या केली. त्यानंतर त्याने गळफास घेत आत्महत्या केली.
पोलिसांची गैर वर्तणूक
शेजाऱ्यांनी हत्या आणि आत्महत्येची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाकल झाली. पण जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याऐवजी पोलिस तिच्याकडे घटना कधी आणि कशी घडली याची चौकशी करत राहिले. धक्कादायक म्हणजे एक महिला पोलीस मोबाईलमध्ये व्हिडिओ शुटिंग करत होती. पोलिसांच्या वर्तणूकीवर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
सूनेकडून सासूची हत्या
दुसऱ्या एका घटनेत राजधानी दिल्लीत एका सूनेने आपल्या सासूची फ्राय पॅनने मारहाण करत हत्या केली. याप्रकरणी आरोपी सुनेला पोलिसांनी अटक केली आहे. हत्या केल्यानंतर सुनेने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी कट रचला. पोलिसांना या प्रकरणाचा शोध लावण्यासाठी दहा दिवस लागले. 86 वर्षांची वृद्ध महिला आपला मुलगा आणि सूनेबरोबर राहात होती. पण सुनेला तिला वृद्धाश्रमात पाठवायचं होतं. त्यामुळे मुलाने आपल्या घरासमोर आणखी एक घर भाड्याने घेत आईला तिथे ठेवलं आणि रुममध्ये सीसीटीव्ही लावला.
घटनेच्या दिवशी सूनेने सासूशी भांडण उकरुन काढलं आणि तिला फ्राय पॅनने जबर मारहाण केली. यात सासू रक्तबंबाळ झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर ती बाथरुममध्ये पडल्याचा बनाव करुन तीने आपल्या पतीला ही गोष्ट सांगितली. पतीने तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तपास सुरु केल्यावर त्यांना रुममध्ये सीसीटीव्ही दिसला. पण त्यातील काही फुटेज डिलेट करण्यात आलं होतं. त्यामुळ पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी आसपास चौकशी केली, यात त्यांना सासू-सूनेचे संबंध ठिक नसल्याची माहिती मिळाली. तसंच पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्येही महिलेचा मृत्यू मारहाण केल्यामुळे झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
या दिशेने पोलिसांनी तपास सुरु करत चौकशीसाठी सुनेला ताब्यात घेतलं. सुरुवातील तीने सासूचा मृत्यू बाथरुममध्ये पडून झाल्याचा दाव केला. पण तिच्या उत्तरात विसंगती आढळल्याने पोलिसांनी तिला दमात घेतलं. अखेर सुनेने आपण सासूची हत्या केल्याची कबूली दिली.