मुंबई : देशातील कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव आता कमी झाला आहे. त्यामुळे आता काही तज्ज्ञांकडून तिसर्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. देशात तिसरी लाट येईल की, नाही यावर सगळ्यांचीच वेगवेगळी मते आहेत. या सगळ्यात कोणत्याही महामारीची लाट का येते ते नीति आयोगने सांगितले आहे. नीति आयोगानुसार लाटेत येणे म्हणजेच कुठेतरी जनतेचा निष्काळजीपणा याला कारणीभूत आहे. निष्काळजीपणा मुळेच साथीचा प्रादुर्भाव देखील वाढतो.
नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल यांनी म्हटले आहे की, 'असे काही देश आहेत ज्यात अजून दुसरी लाट आलेली नाही. जर आपण आवश्यक ते केले आणि बेजबाबदार वर्तन टाळले, तर कोव्हिडचा उद्रेक आपण थांबवू शकतो. खरेतर हे एक सामान्य साथीचे तत्व आहे.
डॉ पॉल यांनी असे स्पष्ट केले की, चार घटकांमुळे नवीन लाट येऊ शकते
1.व्हायरसमध्ये ते सर्वत्र पसरवण्याची क्षमता आणि योग्यता असते.
2.व्हायरस स्वत:ला टिकून ठेवण्यासाठी अतिसंवेदनशील व्यक्ती शोधतो. म्हणून जर लसीकरणाद्वारे किंवा मागील संसर्गापासून आपले संरक्षण झालेले नसेल, तर व्हायरस अशा व्यक्तीला होतो.
3.जिथे विषाणू रुप बदलतो तेथे ते अधिक संसर्गजन्य होते. तसेच तो हूशार होऊ शकतो.
4. जर आपण एकत्र बसलो, अन्न खाल्ले, गर्दी केली असेल आणि मास्क घातला नसेल तर, विषाणूचा फैलाव होण्याची अधिक शक्यता असते.
हा व्हायरस थांबवण्यासाठी सर्वसामान्यांच्या त्यांच्या हातात असलेल्या गोष्टींची डॉ. पौलाने यांनी आठवण करून दिली. ते म्हणाले, "वरील चार घटकांपैकी दोन संवेदनशीलता आणि संसर्गाची शक्यता पूर्णपणे आपल्या म्हणजेच माणसाच्या हातात आहे."
म्हणजेच जर आपण मास्क घालून किंवा लस देऊन व्हायरसपासून लांब ठेऊ शकतो आणि त्यावर नियंत्रण मिळवू शकतो. म्हणून जर आपण कोविड प्रोटोकॉलचे अनुसरण केले तर तिसरी लाट येणार नाही.