ख्रिसमस आणि ईयर एंड सेलिब्रेशन करण्याआधी हे वाचाच

 तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. नाहीतर तुमच्या ख्रिसमस आणि ईयर एंडची फसगत होऊ शकते. 

Updated: Dec 14, 2018, 10:35 AM IST
ख्रिसमस आणि ईयर एंड सेलिब्रेशन करण्याआधी हे वाचाच title=

नवी दिल्ली : ख्रिसमस आणि ईयर एंड आपल्याकडे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. काही महिने अगोदरच याचं प्लानिंग होत असतं. यावर्षीही वर्षाच्या शेवटच्या विकेंडला काय करायचं ? कुठे जायचं? याच अनेकांच नियोजन आधीच झालं असेल. पण या सर्वाची तयारी करताना तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. नाहीतर तुमच्या ख्रिसमस आणि ईयर एंडची फसगत होऊ शकते.

पोलीस तैनात 

सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या वर्षीही विशेष काळजी घेण्यात आली आहे. जागोजागी पोलिसांचा पाहारा तैनात असलेला तुम्हाला दिसेल. त्यामुळे हुल्लडबाजी आणि इतरांना त्रास होईल असं वागणाऱ्यांचं ईयर एंड पोलीस ठाण्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या ग्रुपमध्ये अशापैकी कोणी असेल तर त्याला वेळीच समज द्या. किंवा असं कोणी करताना दिसलं तर पोलिसांशी संपर्क साधा.

दारु बंदी 

दारु म्हणजे सेलिब्रेशन हे अनेकांच समीकरण झालंय. दारू प्यायल्यावर, नशा केल्यावरच सेलिब्रेशन होतं असं अनेकांना वाटत. पण तुमच्या वाहनात दारूचा साठा सापडला तर तुमच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.

वाहतूक नियम

ख्रिसमस आणि ईयर एंडला रस्ते वाहतूकीचे नियम डावलणाऱ्यांचे प्रमाण जास्त असते. यामुळे सरकारच्या तिजोरीत वाढ झाल्याचे आकडेही आपल्याला पाहायला मिळतात. पण यामध्ये अडकलात तर तुम्हाला नवीन वर्षात कोर्ट-कचेरीच्या फेऱ्या माराव्या लागतील. रस्ते वाहतूक नियमही कठोर करण्यात आले आहेत. त्यामुळे दारू पिऊन गाडी चालवणे, रॅश ड्रायव्हींग, विना हेल्मेट-सिटबेल्ट गाडी चालवण्याचा प्रयत्न देखील करु नका.

बॅंक व्यवहार बंद 

 बॅंक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बॅंक कर्मचाऱ्यांनी देशभराच काम बंद ची हाक दिली आहे. त्यामुळे पाच दिवस बॅंक व्य़वहार ठप्प होणार असून सामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे. 21 ते 26 डिसेंबर या काळात पाच दिवस बॅंक बंद राहणार आहेत. त्यामुळे बॅंकेसंबंधी व्यवहार तुम्हाला याआधीच उरकून घ्यावे लागतील.  ऑल इंडिया बँक ऑफिसर कन्फडरेशनने (AIBOC) हा संप पुकारला असून याला देशभरातून प्रतिसाद मिळतोय.