खूनी मांजा! तरुण उद्योजकाचा मृत्यू, चायनिज मांजाने कापला गळा

दुचाकीने जाताना काळ बनून आडवा आला चिनी मांजा, तरुण उद्योजकाचा मृत्यू

Updated: Aug 15, 2022, 04:49 PM IST
खूनी मांजा! तरुण उद्योजकाचा मृत्यू, चायनिज मांजाने कापला गळा title=

Chinese Manjha Death: चायनिज मांजावर बंदी असतानाही याचा सर्रास वापर आजही केला जातो. चायनीज मांजामुळे  (Chinese Manja) आजवर अनेक जणांचे मृत्यू झाले आहेत. अशीच एक दुर्देवी घटना समोर आली आहे. चायनीज मांजामुळे एका तरुण उद्योजकाचा मृत्यू झाला.

अभिषेक असं या तरुण उद्योजकाचं नाव आहे. दिल्लीतल्या मानसरोवर पार्क परिसरातली ही घटना असून अभिषेक रविवारी आपल्या स्कूटरवरुन काही कामासाठी जात होते. पण त्याचवेळी चिनी मांजा त्यांच्या गळ्यात अडकला आणि अभिषेकचा गळा कापला गेला. 

रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
रविवारची दुपार अभिषेक यांच्यासाठी काळ बनून आली. अभिषेक आपल्या स्कूटरवरुन शालीमार गार्डन इथे जात होते. घरापासून काही दूर जाताच नत्थू कॉलनी फ्लाओव्हरजवळ काही मुलं पतंग उडवत होते. त्यासाठी मुलांनी चायनिज मांजाचा वापर केला होता. नेमका हेच अभिषेकच्या मृत्यूचं कारण ठरलं

चायनिज मांजा अभिषेकच्या गळ्यात फसला आणि त्यांचा गळा कापला गेला. यात अभिषेक गंभीर जखमी झाले. आसपासच्या काही लोकांनी तात्काळ अभिषेकला रुग्णालयात दाखल केलं. पण मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच अभिषेक यांचा मृत्यू झाला होता.

मांजा विक्रेत्यांवर कारवाईच गरज 
चायनीज मांजा विकणाऱ्यांवर पोलिस सातत्याने कारवाई करत आहेत. पण तरीही दिल्लीतील अनेक भागात चायनीज मांजा खुलेआम विकला जात आहे. त्यानंतर अनेक दुकानदारांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, मृत अभिषेक हा त्याच्या कुटुंबासह ज्योती कॉलनी परिसरात राहत होता.