Crime News : 'तो' तरुणींना Video Call वर कपडे काढायला सांगायचा अन् मग...

Crime News : सोशल मीडियाचं जग जेवढं आकर्षक आहे तेवढं ते धोकादायक आहे. तिथे वेगवगेळ्या ठिकाणांची लोक भेटतात. मैत्री होते...अगदी प्रेमही होतं...पण आपण चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडलो तर नाही ना...

Updated: Jan 30, 2023, 10:32 AM IST
Crime News : 'तो' तरुणींना Video Call वर कपडे काढायला सांगायचा अन् मग... title=
men to remove their clothes on Video Call Friendship love sex on Instagram Facebook and WhatsApp money from nude video man arrested delhi news

Crime News : आजकाल प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे . त्यामुळे लाखो लोकांचा वेळ हा सोशल मीडियावर जातो. तरुणी पिढीला जणू काही सोशल मीडियाने वेड लावलं आहे. जगात वावरताना एकमेकांशी अगदी घरातील लोकांशीही संवाद थांबला आहे. सोशल मीडियाच्या जगात होणारे मित्रमैत्रीणी ही जास्त जवळीची वाटायला लागली आहे. या सोशल मीडियाचा जेवढा फायदा आहे तेवढं त्याचा धोकादेखील आहे. एकमेकांना ओळखत नसताना, कधी न भेटता अनेक जण मैत्री आणि नंतर प्रेमात पडल्याचे अनेक प्रकरणे समोर आली आहेत. तुम्हीदेखील चुकीच्या माणसाशी मैत्री तर नाही ना केली. कारण एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. 

मैत्री, प्रेम अन् धोका!

इंस्टाग्रामवर आज तरुणाईचा वावर वाढला आहे. या इन्स्टाग्राम एक व्यक्ती महिलांनी मैत्री करायचा...त्यांच्याशी चॅटिंगमधून गप्पा मारायला...गोड बोलून महिलांचा विश्वास जिंकायचा...मग एकदा काय महिला प्रेमात पडल्या की त्यांना व्हिडीओ कॉलकरुन कपडे काढायला सांगायचा...हे एवढं नाही तर तो हे सगळं रेकॉर्डिंग करायचा...(Crime News women to remove their clothes on Video Call Friendship love sex on Instagram Facebook and WhatsApp money from nude video man arrested delhi news)

धक्कादायक!

हा नराधम हे अश्लिल रेकॉर्डिंग त्या महिलांना पाठवायचा आणि त्यांचाकडून पैसे उकळायचा.  या व्यक्तीने एका महिलेकडून 1.25 लाख रुपये मागितले. महिलेने ते दिले देखील...पण तो एवढ्यावर थांबला नाही...त्याचे धमकीचे फोन, मेसेज येताचे. व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करले, अशी धमकी तो द्यायचा. संतापजनक म्हणजे त्या नराधमाने महिलेचे अर्धनग्न व्हिडीओ तिच्या पतीलाही पाठवले आणि 70 हजार रुपयांची मागणी केली. 

कुठलही आहे ही घटना? 

ही संतापजनक घटना राजधानी दिल्लीतील आहे. सदर पीडित महिलेने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर हा प्रकार समोर आला. सायबर क्राइम ऑनलाइन पोर्टलने या तक्रारनंतर आरोपीला अटक केली. चौकशीदरम्यान तो असं अनेक महिलांसोबत केल्याचं उघड झालं. या नराधमाचं नाव सन्नी उर्फ राघव चौहान असं आहे. इंस्टाग्रामवर तो महिलांशी ओळखी करायचा नंतर व्हाट्सअॅपवरही त्यांच्याशी संवाद साधायचा. आरोपी मूळचा इंदूरचा आहे. पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली. आरोपीचे इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर अनेक अकाऊंट्स आहेत. या अकाऊंट्सच्या माध्यमातून तो महिलांना फ्रेंडशिप रिक्वेस्ट पाठवायचा. संतापजनक म्हणजे राघव हा विवाहित असून दोन वर्षांपूर्वी पत्नी त्याला सोडून निघून गेली आहे.