Extramarital Affairs Viral News in Marathi: प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, या ओळी सध्या सर्वांच्या मुखात आहेत. प्रेमाला जात, पात, धर्म, प्रांत अशा मर्यादा नसतात. प्रेमाला ना वयाचं बंधन ना रंगाचं... याचा प्रत्तय देणारी एक घटना समोर आली आहे. एक, दोन नव्हे तर 4 मुलांची आई असलेल्या रुपा नावाच्या महिलेचं एका 19 वर्षाच्या तरुणावर प्रेम जडलं. आता प्रेम म्हटल्यावर हद्द आली कुठं? दोघांनी असा काही निर्णय घेतला की सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय.
बामणोर गावातील रहिवासी असलेल्या 4 मुलांची आई रूपा हिचं चौहाटन आगौर येथील रहिवासी वीरमाराम याच्याशी प्रेमसंबंध होते. वीरमाराम याचं वय अवघं 19 वर्ष. दोघांचं प्रेम होतं, पण समाजाला हे मान्य तरी कसं होणार..? त्यामुळे दोघांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. प्लॅन आखण्यात आला. जागा ठरवण्यात आली. ठरल्याप्रमाणे, दोघेही पोहोचले... झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करत असतानाच महिलेने गळफास लावून घेतला. मात्र, आयुष्य संपवताना तरुणाच्या मनातील स्व:त्व जागा झाला. 19 वर्षाचा प्रियकर घाबरला आणि तो गळफास सोडून पळून गेला. इतके दोघांच्या घरचे वाट पाहत होते.
परिसरातील लोकांनी झालेला प्रकार पाहिल्यानंतर पाठलाग करून तरुणाला पकडलं मात्र, महिलेचा मृत्यू झाला होता. लोकांनी संपूर्ण प्रकाराची माहिती चौहान पोलीस ठाण्यात माहिती दिली. आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि प्रियकराच्या मुसक्या आवळल्या. प्रियकर तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर मृत महिलेचा मृतदेह खाली उतरवून उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. मात्र, प्रकरणात ट्विस्ट आला.
दरम्यान, झालेल्या घटनेच्या आदल्या दिवशी म्हणजेच शनिवारी तरुण घरी एकटाच होता असे सांगण्यात येत आहे. रात्री त्याची मैत्रीण त्याच्या घरी पोहोचली आणि दोघांनी एकत्र रात्र काढली, अशी माहिती तरुणाच्या घराजवळील नागरिकांनी दिली आहे. त्यामुळे नेमकं प्रकरण काय होतं? याचा शोध आता राजस्थान पोलीस घेत आहेत. तर तिसरी बाजू देखील तपासण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय.