Chhindwara 8 Family Members Murder: मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यात सामूहिक हत्याकांड घडल्याचा प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील आदिवासी बहुल क्षेत्रात ठाणे माहुलझिर अंतर्गत बोदलकछार या गावात आदिवासी कुटुंबातील 8 जणांची अमानुषपणे हत्या करण्यात आले आहे. कुटुंबातील मुलानेच सर्व सदस्यांची कुऱ्हाडीने हत्या करण्यात आली. त्यानंतर आरोपीने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.
मुलानेच केलेल्या या भयंकर हत्याकांडाचे खरे कारण अद्यापही समोर आलेले नाहीये. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिवासी कुटुंबातील एका तरुणानेच कुऱ्हाडीने त्याचे आई-वडिल, पत्नी-मुलं आणि भाऊ-वहिनी यांच्यासह आठ जणांची निर्घृणपणे हत्या केली आहे. हत्येनंतर त्यांने स्वतःही आत्महत्या केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी मानसिकरित्या विक्षिप्त होता. त्याने आई, भाऊ, वहिनी, बहिण, पुतण्या आणि दो पुतण्यांची हत्या केली आहे.
ही घटना मंगळवारी मध्यरात्री दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास झाल्याचं घडल्याचे समोर येत आहे. माहुलझिर पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचून त्यांनी संपूर्ण गाव सील केले आहे. छिंदवाडाच्या पोलीस अधीक्षकदेखील घटनास्थळी पोहोचण्यासाठी रवाना झाले होते. या प्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.
छिंदवाडा सामुहिक हत्याकांड प्रकरणात मुख्यमंत्री मोहन यादव यांनी तपासाचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर या दुखःद घटनेवर शोक व्यक्त केला आहे. या घटनेची कसून चौकशी करावी. सरकारमध्ये मंत्री असलेले संपतिया उइके यांना छिंदवाडा येथे जाण्यासाठी सांगितले आहे. संपातिया उइके तिथे जाऊन कुटुंबातील व्यक्तींची भेट घेणार आहे. प्राथमिक चौकशीत आरोपी विक्षिप्त असल्याचे सांगण्यात येतंय, असं मुख्यमंत्री यादव यांनी म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या संपूर्ण घटनाक्रमात 10 वर्षांचा मुलगा सुखरुप बचावला आहे. मात्र, तो गंभीररित्या जखमी आहे. त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हे हत्याकांड कसं घडलं, याचा मात्र अद्याप तपास लागलेला नाहीये. पोलिसांनी घटनास्थळ व संपूर्ण गाव सील केले आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.