Crime News: महिलेचं शीर नसलेल्या मृतदेहाचं रहस्य अखेर उलगडलं, तिच्याच अल्पवयीन मुलाने....; पोलीसही चक्रावले

Crime News: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) बैतूल येथे एका महिलेचा शीर नसलेला मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी अखेर त्याचं रहस्य उलगडलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी महिलेचा पती, अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे. दरम्यान आरोपी अट्टल गुन्हेगार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.   

Updated: Mar 24, 2023, 11:31 AM IST
Crime News: महिलेचं शीर नसलेल्या मृतदेहाचं रहस्य अखेर उलगडलं, तिच्याच अल्पवयीन मुलाने....; पोलीसही चक्रावले title=

Crime News: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) बैतूल येथे एका महिलेचा शीर नसलेला मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी अखेर या गुन्ह्याचा उलगडा केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. महिलेची इतक्या निर्घृणपणे हत्या करण्यामागे इतर कोणी नाही तर तिचा पतीच आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी महिलेच्या अल्पवयीन मुलालाही अटक केली आहे. आरोपीने साक्षादारांना लपवण्याच्या हेतूने आपल्या मुलाची मदत घेतली होती. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 डिसेंबर 2022 रोजी एका महिलेचा शीर नसलेला मृतदेह सापडला होता. एका पुलाखाली हा मृतदेह सापडला होता. महिलेचं शीर नसल्याने पोलिसांना ओळख पटवणं कठीण जात होतं. यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या टीम स्थापन केल्या होत्या.
 
पोलिसांनी सायबर सेलचीदेखील मदत घेतली होती. पोलिसांनी मृतदेह सापडल्यानंतर अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तपास करताना बेपत्ता झाल्याची तक्रार झालेल्या प्रकरणांची माहिती घेण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांना सागर जिल्ह्यातील देवरी येथील रहिवासी दिलीप दांगी यांनी बहिण बेपत्ता झाल्याची तक्रार केल्याची माहिती मिळाली. आपली बहिण दोन महिन्यांपासून बेपत्ता असल्याचं त्यांनी तक्रारीत सांगितलं होतं. 

गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरु केली. पोलिसांनी सर्वात प्रथम राधाच पती शैलेंद्र राजपूत आणि त्याच्या नातेवाईकांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावलं. पण चौकशीला हजर होण्याआधीच शैलेंद्र याने पळ काढला. यानंतर पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी शैलेंद्रची माहिती काढली. यादरम्यान त्यांना तो अट्टल गुन्हेगार असल्याचं समजलं. 

यानंतर पोलिसांनी शैलेंद्रचा शोध सुरु केला. यादरम्यान तो पुण्यात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या एका पथकाने पुण्यात येऊन त्याला अटक केली. चौकशीदरम्यान त्याने आपला गुन्हा कबूल केला. पत्नीशा वाद केला असता केलेल्या मारहाणीत तिचा मृत्यू झाला असा दावा त्याने चौकशीत गेला. 

हत्येनंतर मृतदेह घऱातच ठेवण्यात आला होता. रात्री त्याने आपल्या अल्पवयीन मुलाच्या मदतीने मृतदेह पुलाखाली टाकून दिला. मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी त्याचं शीर कापण्यात आलं असं त्याने सांगितलं आहे. 

गुन्ह्यानंतर शैंलेंद्रला लपण्यासाठी गोविंद वरकडे याने मदत केली. त्यानेच पुण्यात राहण्याची व्यवस्थाही केली. पोलिसांनी आरोपी शैलेंद्र, गोविंद वरकडे आणि अल्पवयीन मुलगा अशा तिघांनाही ताब्यात घेतलं आहे.