क्रेडिट कार्ड वापरताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, म्हणजे तुमचे कधीही नुकसान होणार नाही

क्रेडिट कार्डचे फायदे अनेक आहेत, परंतु थोड्याशा निष्काळजीपणामुळे तुम्ही स्वत:चे तर नुकसान करता.

Updated: Mar 20, 2022, 07:02 PM IST
क्रेडिट कार्ड वापरताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, म्हणजे तुमचे कधीही नुकसान होणार नाही title=

मुंबई : डिजिटल पेमेंटच्या या जगात आता क्रेडिट कार्ड हे देखील महत्वाचे आहे. या सगळ्यात क्रेडिट कार्डमुळे कोणाकडे पैसे नसतील तरी आपल्याला बँक पैसे देते आणि नंतर आपल्याला बँकेला ते पैसे परत करावे लागतात. तसेच ऑनलाईन शॉपिंगच्या वेळी देखील यामुळे बरेच ऑफर्स मिळतात. या सर्व सुविधांमुळे क्रेडिट कार्डचा वापर सातत्याने वाढत आहे. ज्यामुळे आता तुम्हाला बऱ्याच लोकांकडे क्रे़डिट कार्ड असलेले पाहायला मिळेल. तसेच क्रेडिट कार्डचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला बिल भरण्यासाठी 50 दिवसांचा कालावधी मिळतो आणि तोही कोणत्याही अतिरिक्त शुल्क किंवा व्याजाशिवाय.

क्रेडिट कार्डचे फायदे अनेक आहेत, परंतु थोड्याशा निष्काळजीपणामुळे तुम्ही स्वत:चे तर नुकसान करता, शिवाय तुम्ही बँकेसाठी फसवणूक करणारे ठरू शकता. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरताना योग्यती काळजी घ्या म्हणजे तुमचं नुकसान होणार नाही.

क्रेडिट कार्ड बिलिंग सायकल

क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी, क्रेडिट कार्डचे बिलिंग चक्र समजून घेणे आवश्यक आहे. एकदा तुम्हाला कार्डचे बिलिंग सायकल समजले की, त्यापासून होणारा फायदा देखील तुमच्या लक्षात येईल, ज्यामुळे तुमचा फायदाच होईल.

पहिलेतर तुमच्या बिलिंग सायकलचा वास्तविक कालावधी किती आहे हे तुम्ही बँकेकडे तपासावे. कारण बिलिंग सायकल कालावधी 27 दिवस ते 31 दिवसांच्या दरम्यान आहे.

तुमचे क्रेडिट कार्ड स्टेटमेंट दर महिन्याच्या 10 तारखेला जनरेट होत असल्यास, बिलिंग सायकल मागील महिन्याच्या 11 तारखेपासून सुरू होईल आणि चालू महिन्याच्या 10 तारखेपर्यंत सुरू राहील. 

क्रेडिट कार्ड स्टेटमेंट किंवा बिलिंग स्टेटमेंट बिलिंग सायकल किंवा बिलिंग कालावधी दरम्यान तुम्ही क्रेडिट कार्ड कसे वापरले याची माहिती देते. स्टेटमेंटमध्ये तुमच्या बिलिंग सायकल दरम्यान केलेले व्यवहार, किमान देय रक्कम, देय रक्कम, देय तारीख इत्यादींची माहिती असते.

देय तारखेनंतर तीन दिवसांपर्यंत क्रेडिट कार्ड पेमेंट करण्याची संधी आहे. 
यानंतरही पैसे न भरल्यास तुम्हाला विलंब केल्यामुळे पैसे आकारले जातील आणि हे शुल्क खूप जास्त आहे. जे तुमच्या पुढील बिलात समाविष्ट केले जातील.

क्रेडिट कार्ड बिल भरणा

क्रेडिट कार्डचे बिल नेहमी वेळेत भरले पाहिजे, असे कायदा सांगतो. यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारतो, तसेच त्या व्यक्तीला जास्तीचे व्याज द्यावे लागत नाही आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे तणावापासून दूर राहतो.

जर तुम्ही कोणत्याही कारणास्तव संपूर्ण क्रेडिट कार्ड बिल भरण्यास सक्षम नसाल, तर तुम्ही किमान रक्कम भरणे आवश्यक आहे.

क्रेडिट कार्डचे बिल भरताना तुम्हाला तीन पर्याय दिसतात. प्रथम - एकूण बिल भरणे, दुसरे - किमान रक्कम आणि तिसरे - कमी रक्कम, तर यामध्ये तुम्ही तुमचं बिल भरुन तणावापासून लांब राहाल. ज्यामुळे तुम्ही किमान पेमेंट करून तुमचा दंड टाळू शकता.

ही किमान रक्कम एकूण बिलाच्या 5 टक्के आहे. यामध्ये मासिक हप्ता भरणे वेगळे आहे.

म्हणजे समजा जर तुमच्या कोणत्याही वस्तूचा EMI 2000 रुपये असेल आणि तुम्ही या कालावधीत 5000 रुपयांची खरेदी केली असेल, तर तुम्हाला किमान 5200 रुपये द्यावे लागतील. परंतु तुमची, EMI रक्कम अतिरिक्त असेल.

उदाहरणार्थ, जर फोनचा ईएमआय दरमहा 5000 रुपये असेल आणि तुम्ही त्या महिन्यात 10 हजारांची खरेदी केली असेल, तर किमान रक्कम 5500 रुपये (5000 + 500) असेल.

परंतु पेमेंटमध्ये विलंब झाल्यामुळे तुम्हाला नुकसान सहन करावा लागू शकतो. क्रेडिट कार्ड बिल जनरेट झाल्यानंतर, तुम्हाला पेमेंट करण्यासाठी तीन आठवडे मिळतात. तुम्ही किमान पेमेंट केल्यास, तुम्हाला मोफत व्याज कालावधीचा लाभ मिळणार नाही. पूर्ण पेमेंट होईपर्यंत तुम्हाला व्याजमुक्त कालावधी मिळणार नाही. त्यानंतर प्रत्येक पेमेंटला मासिक व्याज लागेल.

तुम्ही पूर्ण पेमेंट करेपर्यंत तुम्हाला लागू असलेले व्याज भरावे लागेल. अशा प्रकारे, तुम्ही किमान रक्कम भरून दंड आणि विलंब शुल्क टाळू शकता.