COVID19 : मोदी सरकार उचलणार वॅक्सिनचा पूर्ण खर्च ?

कोरोनाच्या (Corona) वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर एक दिलासादायक बातमी

Updated: Nov 26, 2020, 02:01 PM IST
COVID19 : मोदी सरकार उचलणार वॅक्सिनचा पूर्ण खर्च ? title=

नवी दिल्ली : कोरोनाच्या (Corona) वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर एक दिलासादायक बातमी समोर येतेय. यानुसार मोदी सरकार वॅक्सिनचा संपूर्ण सरकार केंद्र सरकार उचलू शकते अशी माहिती समोर येते. न्यूज एजंसी रॉयटर्सने यासंदर्भात माहिती दिलीय. यासंदर्भात सर्वसाधारण बजेटची घोषणा केली जाऊ शकते. फेब्रुवारी शेवटपर्यंत कोरोना लसीकरण सुरु होऊ शकते. 

कोरोनाला पूर्णपणे नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकार शक्य तितके प्रयत्न करतंय. लसीकरणाचा पूर्ण खर्च केंद्र सरकार उचलण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात सहमती मिळाली तर अर्थसंकल्पात याची घोषणा केली जाऊ शकते असेही म्हटलं जातंय.

सरकारने यासंदर्भात पूर्ण योजना तयार करण्यात आलीय. देशातील प्रत्येक नागरिकाला लस देण्यासाठी ६ ते ७ डॉलर म्हणजे पाचशे रुपयांहून अधिक खर्च येईल. या कारणाने सरकारने १३० कोटी जनतेसाठी वॅक्सिन द्यायला पाचशे अरबचा बजेट ठरवण्यात आल्याचे म्हटले जाते. चालू आर्थिक वर्षाच्या शेवटी याची व्यवस्था केली जाऊ शकते. ज्यानंतर वॅक्सिन पोहोचवण्यासाठी फंडची कमी होणार नसल्याचेही सांगण्यात येतंय. 

पंतप्रधानांचा संदेश 

जेव्हा वॅक्सिन येईल तेव्हा सर्वांपर्यंत पोहोचेल. यातून कोणीही सुटणार नसल्याचे पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात म्हटले होते. आपलं संविधान २१ शतकातील प्रत्येक आव्हानाशी लढण्यास मार्गदर्शन करतं. संविधान ७५ वर्षांकडे वेगाने चाललंय. स्वतंत्र भारत ७५ रीच्या दिशेने चाललाय. राष्ट्राला दिलेल्या संकल्पात पूर्ण ताळमेळ साधावा लागेल असे पंतप्रधान मोदी म्हणाले. संविधान दिनानिमित्त आज पंतप्रधानांनी देशातील जनतेशी संवाद साधला.