कोरोना व्हायरसचा शरीरातील 'या' अवयवांवरही परिणाम होतो?

नव्या अध्ययनानुसार...

Updated: May 15, 2020, 03:54 PM IST
कोरोना व्हायरसचा शरीरातील 'या' अवयवांवरही परिणाम होतो?  title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस रुग्णांवर नुकत्याच झालेल्या एका अध्ययनानुसार, हा व्हायरस शरीराच्या इतर भागांवरही परिणाम करत असल्याची बाब पुढे आली आहे. अध्ययनानुसार, आतड्यांवर, मूत्रपिंड यांसारख्या शरीरातील इतर भागांवरही या संसर्गाचा परिणाम होत असल्याचं समोर आलं आहे.

या अध्ययनानुसार मिळालेल्या निष्कर्षांनुसार, कोरोना व्हायरस (Coronavirus) रुग्णांमध्ये रक्तांच्या गुठळ्यांसहित काही अस्पष्ट लक्षणं, जे युवकांमध्ये स्ट्रोकचं कारण ठरतं. एवढंच नाही तर हे डोकेदुखी आणि मूत्रपिंड निकामी होण्यासही जबाबदार ठरु शकतं आहेत. 

नेचर मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका अध्ययनानुसार, हाँगकाँगच्या विद्यापिठात  जी झोऊ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वटवाघूळ आणि लोकांच्या आतड्यांसंबंधी ऑर्गेनॉइड्स अंगांचा प्रयोगशाळांमध्ये अभ्यास केला असता आढळले की, हा व्हायरस केवळ ऑर्गेनॉइड्समध्ये राहत नाही तर त्यांना पुन्हा विकसितही करतो.

तर दुसरीकडे, जर्मनीमध्ये यूनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर हॅम्बर्ग-एपपॉर्फेन यांच्या टीमने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 27 मृतदेहांचं शवविच्छेदन केलं. त्यांनी न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका पत्रात लिहिलं की, 'SARS-CoV-2 कोरोनो व्हायरस रुग्णाच्या मूत्रपिंडात आढळल्याने रुग्णाच्या विशिष्ट अवयवांचं अधिक नुकसान होतं.

मागील अहवालांमध्ये असं देखील आढळलं आहे की, या प्राणघातक कोरोना व्हायरसचा फुफ्फुसं, घसा, हृदय, यकृत आणि या विषाणूचा संसर्ग झालेल्या लोकांच्या मेंदूवर विपरीत परिणाम होऊ शकतो.