मुंबई : Coronavirus : देशात कोरोनाचा उद्रेक होत आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचे संकट वाढले आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेशात शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात आज रात्रीपासून कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारण देशात कोरोना रूग्णसंख्येत पुन्हा कमालीची वाढ झाली आहे. (Covid cases are spreading in Indian cities again) एका दिवसांत 27 टक्के रूग्णवाढ झाली असून गेल्या तीन दिवसांत रूग्णसंख्या 2.6 पटींनी वाढली आहे. गेल्या 24 तासांत देशात 16,700 रूग्ण आढळले आहेत.
देशात कोरोना रूग्णसंख्येचा पुन्हा उद्रेक झाला आहे. देशात गेल्या 24 तासांत तब्बल 16 हजार 700 रूग्ण आढळले. एका दिवसांत 27 टक्क्यांनी रूग्णसंख्येत वाढ झालीय. तर गेल्या तीन दिवसांची तुलना केली तर कालची रूग्णसंख्या 2.6 पटींनी वाढली. गेल्या 71 दिवसांतली सर्वाधिक रूग्णसंख्या आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळुरू या महानगरांमध्ये सर्वाधिक रूग्णवाढ झाली आहे.
महाराष्ट्रात एका दिवसांत 40 टक्क्यांनी रूग्ण वाढलेत. तर तर मुंबईत 45 टक्क्यांनी रूग्णसंख्येत वाढ झालीय. कोलकात्यात कोरोना झपाट्याने पसरतोय. कोलकात्यात 102 टक्क्यांनी रूग्णवाढ झाली. रूग्णसंख्या वाढीत महाराष्ट्र अव्वल आहे, तर दुसऱ्यास्थानी केरळ आहे.
देशात ओमायक्रॉनचा वेगाने फैलाव होतोय. ओमायक्रॉनग्रस्तांची संख्या जवळपास 1000 जवळ पोहोचली आहे. 22 राज्यांमध्ये ओमायक्रॉन पसरला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने 8 राज्यांना पत्र लिहून इशारा दिला आहे. कोरोना नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यास या राज्यांना सांगण्यात आला आहे.
दिल्ली, हरियाणा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, झारखंड यांना हा इशारा देण्यात आलाय. लग्नसमारंभ, इतर सामाजिक कार्यक्रम, सोहळे, सुट्ट्यांनिमित्त झालेली गर्दी यावर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेत.