नवी दिल्ली : मोदी सरकारने कोरोना व्हायरसच्या संक्रमणाची तातडीने चाचणी व्हावी यासाठी चीनकडून रॅपिट टेस्ट किट मागवण्यात आले होते. या किटबाबत आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. गुणवत्तेत कमी असलेले किट चीनच्या कंपन्यांना पुन्हा पाठवण्यात येणार आहे. तसेच या किटचे पैसे देखील दिले जाणार नाही. आयसीएमआरने या किटना पूर्णपणे विरोध केला आहे.
आयसीएमआरने सांगितल्याप्रमाणे,'अनेक राज्यांनी किटच्या गुणवत्तेबाबत तक्रार केली आहे. यानंतर ही गोष्ट समोर आली आहे. या किटमधून जो निकाल समोर येत आहे. त्यामध्ये खूप तफावत आहे.' त्यामुळे गुणवत्तेत खराब असलेले किट पुन्हा चीनला परत पाठवण्यात येणार आहेत.
आयसीएमआरने सांगितलं की, जगभरात एंटीबॉडी रॅपिट टेस्ट किटची मागणी केली आहे. अनेक देशांत या किटना मोठ्या प्रमाणात स्विकारलं आहे. कोविड-१९ च्या संक्रमणाची चाचणी करण्यासाठी किट मागवण्यात आले आणि राज्यांना पाठवण्यात आले. ज्या कंपन्यांनी Biomedemics आणि Wondfo मधून हे किट मागवण्यात आले होते. त्यांना इंटरनॅशनल सर्टिफिकेट देखील देण्यात आले आहेत.
ICMR ने दोन कंपन्यांना किटचे पैसे दिलेले नाहीत. किटबाबत तक्रार समोर आल्यानंतर कंपन्यांनी किट परत करण्याचा निर्णय घेतला आहे. चार वेळा चर्चा करून किटचे दर ठरवण्यात आले आहेत. पहिल्यांदाच भारताने कोणत्या एजन्सीकडून किट मागवले आहेत.