सलग तिसऱ्या दिवशी देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ; तिसऱ्या लाटेची तर सुरूवात नाही ना?

 कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने देशात कहर केला होता. पुन्हा कोविड 19च्या नवीन रुग्णांच्या नोंद होण्याच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

Updated: Aug 28, 2021, 12:03 PM IST
सलग तिसऱ्या दिवशी देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ; तिसऱ्या लाटेची तर सुरूवात नाही ना? title=

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने देशात कहर केला होता. पुन्हा कोविड 19च्या नवीन रुग्णांच्या नोंद होण्याच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या 24 तासात देशात 46 हजाराहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात देसात 46 हजार 800 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच कोरोनामुळे देशात 509 लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात यावेळी कोरोनाचे 3 लाख 59 हजारहून अधिक ऍक्टिव केसेस आहेत.  तर ऍक्टिव केसेस कोरोनाबाधितांच्या संख्येच्या 1.10 टक्के आहे. शुक्रवारी भारतात 44 हजार 658 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती.

रिकवरी रेट 97 टक्क्यांवर
गेल्या 24 तासात 31 हजार 374 संक्रमित रिकवर झाले आहेत. देशात कोविड19 च्या संसर्गातून बरे झालेल्यांचे प्रमाण 97.56 टक्के इतके आहे. आठवड्याचा पॉझिटिविटी दर 2.19 टक्के आहे. गेल्या 64 दिवसामध्ये हा दर 3 टक्क्यांहून कमी आहे.

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका ओसरत असून संभाव्य तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. अशातच कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. तर शुक्रवारी एका दिवसात संपूर्ण देशभरात 1 करोड 64 हजार लोकांना लस टोचण्यात आली आहे.