कोरोना हॉटस्पॉट असलेल्या भागांसाठी ICMRकडून गाईडलाईन्स जाहीर

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये कोरोना हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी कोणत्या लोकांची चाचणी केली जाईल आणि कशी केली जाईल या गोष्टींचा तपशील दिला आहे.

Updated: Apr 18, 2020, 04:16 PM IST
 कोरोना हॉटस्पॉट असलेल्या भागांसाठी ICMRकडून गाईडलाईन्स जाहीर title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसचे सर्वाधित रुग्ण असलेल्या हॉटस्पॉट भागांसाठी इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) नव्या गाईडलाईन्स अर्थात काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये कोरोना हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी कोणत्या लोकांची चाचणी केली जाईल आणि कशी केली जाईल या गोष्टींचा तपशील देण्यात आला आहे.

हॉटस्पॉटमध्ये कोणात्या लोकांच्या चाचण्या होणार -

- कोरोना हॉटस्पॉट असलेल्या भागात ज्या लोकांना सर्दी, खोकला किंवा ताप आहे त्या लोकांची कोविड चाचणी होणार आहे. 
- अशा लोकांची आधी RT PCR चाचणी केली जाणार आणि सात दिवसांनंतर रॅपिड एन्टीबॉडी चाचणी होणार. 
- जर रुग्णाची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली तर त्याला 7 दिवसांसाठी क्वारंटाईन केलं जाईल. 
- या सात दिवसांमध्ये पुन्हा कोरोनाची लक्षणं आढळल्यास त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केलं जाईल.

इतर कोणत्या लोकांच्या चाचण्या होणार -

- ज्या लोकांमध्ये कोरोनाची लक्षणं आहेत आणि जो परदेशातून आला आहे.
- ज्या रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे आणि त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणं दिसल्यास त्या व्यक्तीचीही चाचणी केली जाणार आहे.
- कोरोनाची लक्षणं आढळलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची चाचणी केली जाणार आहे.
- SARI (Severe Acute Respiratory Illness)ची लागण झालेल्या सर्व रुग्णांची चाचणी केली जाणार आहे.

आयसीएमआरने यापूर्वीही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. आता त्यात काही बदल करुन ते पुन्हा जारी करण्यात आले आहे. आता या आधारे, देशभरात मोठ्या प्रमाणात चाचण्या केल्या जातील. कोरोनाचा कोणताही संभाव्य रुग्ण किंवा कोरोनाची लक्षणं आढळलेला कोणताही व्यक्ती चाचणी केल्याशिवाय सुटू नये हाच इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचा हेतू आहे.