कोरोनाची डोकेदुखी कमी होते म्हणता म्हणता आला नवा व्हेरिएंट, 30 देशांमध्ये दहशत

डेल्टा आणि डेल्टा प्लसचा डोक्याला ताप...त्यानंतर आता या नव्या व्हेरियंटची दहशत 

Updated: Jul 7, 2021, 11:09 PM IST
कोरोनाची डोकेदुखी कमी होते म्हणता म्हणता आला नवा व्हेरिएंट, 30 देशांमध्ये दहशत title=

मुंबई: कोरोनाची डोकेदुखी जरा कुठे कमी झाली असं वाटत असतानाच आता कोरोनाच्या नव्या व्हेरियटनं 30 देशांमध्ये शिरकाव केला. हा नवा व्हेरियंट डेल्टा व्हेरियंटपेक्षा कितीतरी पट जास्त घातक आहे. त्यामुळे जगातल्या सर्व आरोग्य यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

कोरोनाच्या पहिल्या व्हेरिएंटपेक्षा डेल्टा आणि डेल्टा प्लस डोक्याला ताप ठरला आहे. त्यापाठोपाठ आता 30 देशांमध्ये 'लॅम्ब्डा' व्हेरियंटची दहशत पसरत आहे. कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचं आव्हान जागतीक आरोग्य संघटनेनं दिलं आहे. 

कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटनं जगात दहशत माजवलेली असताना आता लॅम्ब्डा व्हेरियंटही तितक्याच वेगानं पसरतो आहे. अवघ्या 4 आठवड्यात लॅम्ब्डा व्हेरियंटनं 30 देशांमध्ये हातपाय पसरले आहेत. त्यामुळे जगाची डोकेदुखी वाढली आहे. सगळ्यात आधी पेरू या देशात लॅम्ब्डा व्हेरियंट आढळबून आला होता. त्यानंतर आता यूकेत 6 केसेस आढळून आल्या आहेत. 

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार लॅम्ब्डा  हे C.37 स्ट्रेनचं रूप मानलं जातं. तो डेल्टा प्लसपेक्षाही प्रचंड घातक आहे. लस घेतलेल्या लोकांनाही लॅम्ब्डाची लागण होऊ शकते. कोरोनाची दुसरी लाट काहीशी ओसरली असली तरी डेल्टा प्लस आणि लॅम्ब्डानं सर्वांना धडकी भरवली आहे. सुदैवानं भारतात लॅम्ब्डाचा शिरकाव झालेला नाही. मात्र पहिल्या आणि दुस-या लाटेचा अनुभव पाहता भारतीयांनी गाफील राहणं म्हणजे संकटाला पुन्हा आमंत्रण देण्यासारखं ठरेल.