भारतात तीन-चार महिन्यात कोरोनाची लस उपलब्ध

भारतात (India) येत्या तीन ते चार महिन्यात कोरोनाची लस ( coronavirus vaccine) उपलब्ध होईल अशी माहिती आज केंद्र सरकारने दिली आहे. 

Updated: Nov 20, 2020, 10:56 PM IST
भारतात तीन-चार महिन्यात कोरोनाची लस उपलब्ध   title=

मुंबई : भारतात (India) येत्या तीन ते चार महिन्यात कोरोनाची लस ( coronavirus vaccine) उपलब्ध होईल अशी माहिती आज केंद्र सरकारने दिली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी पत्रकार परिषदेत याचे तपशील दिले. इतकंच नाही तर जून-जुलैपर्यंत ३० कोटी लोकांना कोरोना प्रतिबंधक लस मिळेल असा दावाही त्यांनी केला आहे. केंद्र सरकार त्यासाठी तयारी करत असल्याचे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, कोरोना 'लस'च्या शिपींगसाठी खासगी कंपन्यांकडून विशेष बदल करण्यात येत आहे. कोरोना लस सुरक्षीत ठेवण्यासाठी डीप फ्रोजन युनीट्सची आवश्यकता असते. त्यामुळे खासगी शिपींग कंपन्यांकडून लशीची वाहतूक करण्यासाठी विशेष युनिट्सची रचना करण्यात येत आहे. 

कोरोना प्रतिबंधक कोव्हिशील्ड लशीचा डबल डोस जास्तीत जास्त एक हजार रुपयांपर्यंत मिळणार आहे. पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पुनावाला यांनी या लशीच्या किंमतीबाबत माहिती दिलीय. दरम्यान फेब्रुवारी २०१२१ पर्यंत कोरोनायोद्धा आणि वृद्धांसाठी लस उपलब्ध होईल.. तर २०२४ पर्यंत सर्व भारतीयांपर्यंत कोरोनाची लस पोहोचलेली असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, देशात कोरोना रुग्णांची संख्या आज ९० लाख पार गेलीय. आज भारतात कोरोनाचे ४५ हजार ८८२ रुग्ण वाढलेत. तर २४ तासांत ५८४ कोरोना रुग्णांचा बळी गेला आहे. दुसरीकडे ४४ हजार ४०७ जणांनी आज करोनावर मात केलीय. त्यामुळं कोरोना मुक्त झालेल्यांचा आकडा वाढून तो ८४ लाख २८ हजारांच्या पुढे गेला आहे. या घडीला देशात ४ लाख ४४ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.