Corona Vaccination : गरोदर महिलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा, अशा प्रकारे करा नोंदणी

गरोदर महिलांच्या लसीकरणासाठीच्या मार्गदर्शक सूचनाही प्रसिद्ध 

Updated: Jul 2, 2021, 07:08 PM IST
Corona Vaccination : गरोदर महिलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा, अशा प्रकारे करा नोंदणी  title=
प्रतिकात्मक छायाचित्र

Corona Vaccination : कोरोनाच्या संक्रमणाचा धोका उदभवण्याची भीती असणाऱ्या अनेक गरोदर महिला आता कोरोना प्रतिबंधात्मक लस घेऊ शकणार आहेत. ज्यामुळं आई होऊ पाहणाऱ्या महिलांसाठी हा मोठा दिलासा आहे. लसीकरणासाठीच्या Cowin या अॅपवर गरोदर महिला नोंदणी करु शकतात, किंवा घराजवळ असणाऱ्या लसीकरण केंद्रावर जाऊनही त्या लस घेऊ शकतात. 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या हवाल्यानं यासंदर्भातील वृत्त एएनाय या वृत्तसंस्थेनं जाहीर केलं. 25 जूनलाच केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं गरोदर महिलांच्या कोरोना (Corona) लसीकरणाचा मार्ग मोकळा झाल्याची बाब जाहीर केली. पत्रकार परिषदेत माध्यमांना संबोधित करताना आयसीएमार संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी यासंदर्भातील माहिती दिली. सोबतच त्यांनी गरोदर महिलांच्या लसीकरणासाठीच्या मार्गदर्शक सूचनाही प्रसिद्ध केल्याचं सांगितलं. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून फ्रंटलाईन वर्कर्स आणि लसीकरम केंद्रावरील कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठीच्या सर्व सूचनाही दिल्या आहेत. सोबतच लस घेण्यासाठी आलेल्या महिलांना लसीचं महत्त्वं आणि लस घेतल्यानंतर घ्यायची काळजी यासंदर्भातील सूचना देण्यासही सांगण्यात आलं आहे. 

Corona Vaccine | 'कोरोना लसीमुळं वंध्यत्वाचा धोका?', केंद्रीय आरोग्य मंत्रालय काय म्हणतंय ऐकलं का?

 

दरम्यान, स्तनदा माता, आणि गरोदर महिलांसाठी कोरोना लसीकरण खरंच सुरक्षित आहे का आणि लसीकरणामुळं पुरुष आणि महिलांमध्ये वंध्यत्वाचा धोका उद्भवतो अशा आशयाची काही वृत्त मागील काही दिवसांमध्ये माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली, ज्यामुळं अनेक चर्चांना आणि शंकांना वाव मिळाला. अखेर आरोग्य मंत्रालयानं स्वतंत्र पत्रक प्रसिद्ध करत याबाबतचं चित्र स्पष्ट केलं होतं. 

जागतिक स्तरावर गरोदर महिलांवर फार कमी लसींची चाचणी घेण्यात आली आहे. काही देशांमध्ये भारतात आताच परवानगी मिळालेल्या मॉडर्ना लसीचा गरोदर महिलांसाठी वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे.