Corona Vaccination: लसीकरण नोंदणी आता आणखी सोपी, CoWIN शी जोडले गेले 91 App आणि पोर्टल

लसीकरणाचं नोंदणीकरण आता आणखी सोप होणार आहे.

Updated: Jun 18, 2021, 06:56 PM IST
Corona Vaccination: लसीकरण नोंदणी आता आणखी सोपी, CoWIN शी जोडले गेले 91 App आणि पोर्टल title=

मुंबई : लसीकरणासाठी तुम्ही नोंदणी करणार असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. लसीकरणाचं नोंदणीकरण आता आणखी सोप होणार आहे. CoWIN शी आता 91 App आणि वेबसाईट जोडल्या गेल्या आहेत. 

कॉईन पोर्टल, आरोग्य सेतू आणि उमंग या Appबरोबरच 91 App आणि बेवसाईट CoWIN शी जोडण्यात आल्याची माहिती CoWIN चे अध्यक्ष आर एस शर्मा यांनी दिली आहे. 

CoWIN शी जोडले हे App
पेटीएम, Max Health Care, Indigo, Dr Reddys, Make My Trip या खासगी App आणि वेबसाईट CoWIN शी संलग्न करण्यात आल्या आहेत. यामुळे लसीकरणाला वेग येईल. खासगी Appवर करण्यात आलेली नोंदणी CoWIN वर पाहिला मिळणार आहे. यामुळे केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली सर्व माहिती एकत्रीत होईल.