पंतप्रधानांच्या 'पॅकेज'ची अर्थमंत्री करणार ३ टप्प्यात घोषणा, या घटकांना दिलासा

कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या अर्थव्यवस्थेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आर्थिक पॅकेजची घोषणा केली. 

Updated: May 13, 2020, 01:36 PM IST
पंतप्रधानांच्या 'पॅकेज'ची अर्थमंत्री करणार ३ टप्प्यात घोषणा, या घटकांना दिलासा title=

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या अर्थव्यवस्थेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आर्थिक पॅकेजची घोषणा केली. मंगळवारी जनतेशी संवाद साधताना पंतप्रधानांनी २० लाख कोटी रुपयांचं पॅकेज देत असल्याचं सांगितलं. या पॅकेजबाबत अर्थमंत्री निर्मला सितारमण विस्तृत सांगतील, असंही मोदी म्हणाले.

पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटीच्या पॅकेजबद्दल या गोष्टी जाणून घ्या !

पंतप्रधानांनी घोषणा केलेलं हे पॅकेज अर्थमंत्री निर्मला सितारमण तीन टप्प्यांमध्ये मांडतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आज पहिल्या दिवशी गरिबांसाठी आर्थिक पॅकेज दिलं जाईल, तर १४ मे रोजी सुक्ष्म लघू उद्योगासाठी पॅकेज देण्यात येईल. १५ मे रोजी कंपन्यांसाठी पॅकेज दिलं जाईल, असं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण या आज संध्याकाळी ४ वाजता संवाद साधणार आहे. सुरुवातीला निर्मला सितारमण या दुपारी १ वाजता बोलतील, असं सांगण्यात आलं होतं. 

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्दे

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषित केलेलं २० लाख कोटी रुपयांचं पॅकेज हे जीडीपीच्या १० टक्के असणार आहे. या पॅकेजसोबतच मोदींनी आत्मनिर्भर अभियानाची घोषणा केली आहे. या माध्यमातून स्थानिक उद्योग आणि स्वदेशी उत्पादनांना चालना देण्याचं आवाहन मोदींनी देशाच्या जनतेला केलं आहे.