Covid 19: आज इतक्या रुग्णांची वाढ, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केली चिंता

देशात कोरोनाने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. पॉझिटिव्हीटी रेट ही वाढला आहे.

Updated: Jun 22, 2022, 10:27 PM IST
Covid 19: आज इतक्या रुग्णांची वाढ, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केली चिंता title=

मुंबई : देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव होताना दिसत आहे. दिल्ली-एनसीआर असो की आर्थिक राजधानी मुंबई. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे दोन्ही शहरांमध्ये चिंता वाढली आहे. कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट वाढल्याने चिंता ही वाढत आहे. (Covid cases Today)

आर्थिक राजधानी मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह रेट 20 टक्क्यांवर पोहोचला आहे. आज एकाच दिवसात कोरोनाचे 1648 नवीन रुग्ण आढळले आहेत. आज मुंबईतील रुग्णालयात 96 कोरोना रुग्णांना दाखल करण्यात आले आहे.

दिल्लीच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी गेल्या 24 तासांत संसर्गामुळे 1 जणाचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, 19,165 चाचण्यांपैकी ही प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या नवीन प्रकरणांसह, राष्ट्रीय राजधानीत एकूण संक्रमितांची संख्या 19,24,532 झाली आहे, तर मृतांची संख्या 26,239 वर पोहोचली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव

मुंबईत सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 13,501 वर पोहोचली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे दोघेही कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी आज आली. मात्र नंतर मुख्यमंत्र्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. तर राज्यपालांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

देशात 12,259 नवीन रुग्णांची पुष्टी

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आज पुन्हा एकदा वाढत्या कोरोना प्रकरणांवर चिंता व्यक्त केली आहे. आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 12,249 नवीन रुग्णांची पुष्टी झाली आहे. यासह, देशातील संक्रमितांची संख्या 4,33,31,645 वर पोहोचली आहे. त्याच वेळी, संसर्गामुळे आणखी 13 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर, मृतांची संख्या 5,24,903 वर पोहोचली आहे.