फोडणी देताच झाला मोठा स्फोट, भांड्याचे दोन तुकडे, फुड ब्लॉगरचा VIDEO Viral

How To Cook In Clay Pot: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. फुड ब्लॉगरचे व्हिडिओ तर खोऱ्याने पडलेले असतातच. अशातच एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 7, 2023, 04:14 PM IST
फोडणी देताच झाला मोठा स्फोट, भांड्याचे दोन तुकडे, फुड ब्लॉगरचा VIDEO Viral title=
cooking in a clay pot on gas stove can be dangerous watch viral video

How To Cook In Clay Pot: जेवण बनवणे हे महाकठिण काम असते. स्वयंपाक करत असताना गृहिणी सतत गॅसजवळ असतात अशावेळी फार काळजीपूर्वक काम करणे आवश्यक असते. अनेकदा स्वयंपाक करत असताना दुर्घटनाही घडतात. या कधी कधी जीवावरही बेतू शकतात. अलीकडेच मातीच्या भांड्यात शिजवलेले जेवण हे चविष्ट तर लागतेच पण पौष्टिकही असते. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. मातीच्या भांड्यात शिजवलेले जेवण, पाट्यावर वाटलेली चटणी असो किंवा चुलीवरील जेवण असे अनेक व्हिडिओ ट्रेंड होत असतात. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात फूड ब्लॉगर मातीच्या भांड्यात जेवण बनवायचा प्रयत्न करत आहे. मात्र, त्याच वेळी असं काही घडलं की मोठा अनर्थ टळला आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ आफरीन नावाच्या एका फूड ब्लॉगरने शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये तिने लिहलं आहे की, जेवण बनवत असताना घडली मोठी चूक. मातीच्या भांड्यात जेवण बनवत असताना सावधान, असं कॅप्शन इन्स्टाग्रामवर तिने दिलं आहे. 

व्हिडिओत काय आहे. 

व्हायरल झालेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, ब्लॉगरने मातीचे भांडे गॅसवर ठेवले त्यानंतर गॅस सुरू करुन त्यात एक चमचा तूप, जीरा आणि कडिपत्त्याची फोडणी देत होती. त्याचवेळी अचानक मातीचे भांडे फुटले आणि मोठा आवाज आला. मातीचे भांडे पूर्णपणे तुटून गेले होते. रोजचे काम करत असतानाही सावध राहण्याची गरज आहे. या घटनेनंतर ब्लॉगरने युजर्सना एक सल्ला देखील दिला आहे. असे प्रयोग पुन्हा कधी न करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. 

31 ऑगस्ट रोजी हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. आत्तापर्यंत 48 लाख जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर, 1015 लाखाहून अधिक जणांनी त्यावर लाइक केले आहे. त्याव्यतिरिक्त युजर्स कमेंट करुन त्यांची मतेदेखील मांडत आहेत. एकाने लिहलं आहे की, मातीचे भांडे वापरताना आधीच सगळी माहिती करुन घ्या. नवीन लोकांनी मातीचे भांडे वापरताना मोठ्यांकडून माहिती घ्यावी. तर, एकाने म्हटलं आहे की, मातीच्या भांड्यात जेवण बनवत असताना खास पद्धतीची ट्रेनिंग घेण्याची गरज आहे. तर, एकाने म्हटलं आहे की, मातीच्या भांड्याचा उपयोग करण्यापूर्वी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवायला पाहिजे. त्यानंतर व्यवस्थित सुकवणेदेखील महत्त्वाचे आहे. मगच जेवण बनवण्यासाठी त्याचा वापर करावा.